शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात रेल्वेवर दगडफेक, महिलेचे मंगळसूत्र लंपास; पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:33 IST

मिरज : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे कोल्हापूर - पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र ...

मिरज : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे कोल्हापूर-पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून हिसकावून लंपास केले. महिला प्रवाशाने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यानी लोको पायलटवर दगडफेक करून अंधारात पलायन केले. याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी मध्यरात्री सव्वा वाजता कोरेगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. कोल्हापूर-पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाला लुटल्याने तिच्या मुलाने साखळी ओढून एक्स्प्रेस थांबविली. एक्स्प्रेस थांबल्याचे पाहून चोरट्यांनी इंजिन चालकावर दगडफेक केली.या एक्स्प्रेसमधून धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा (वय ५८ रा. कांदिवली) या महिला प्रवासी कुटुंबातील सदस्यांसमवेत कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही एक्स्प्रेस सुटली. रात्री एक वाजून दहा मिनिटांनी कोरेगाव रेल्वे स्थानकावर आली. कोरेगाव ते कराड दरम्यान एकेरी लोहमार्ग असल्याने क्रॉसिंगसाठी एक्स्प्रेसला कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. दहा मिनिटे ही एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती.एक वाजून वीस मिनिटांनी एक्स्प्रेस पुढच्या प्रवासाला निघाली असतानाच अचानक उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने धर्मादेवी विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मणी मंगळसूत्र खेचून नेले. विश्वकर्मा यांनी आरडाओरडा करताच त्यांचा मुलगा सतीश हा झोपेतून उठला. त्याने एक्स्प्रेसमधील साखळी ओढल्यानंतर इंजिन चालकाने प्रसंगावधान राखत एक्स्प्रेस जागेवर थांबवली. एक्स्प्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांनी चालकांच्या दिशेने दगडफेक केली. अंधाराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते तिघेजण पसार झाले.

कोल्हापूरमध्ये पोहोचताच तक्रारविश्वकर्मा या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी नऊ वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मिरज रेल्वे पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. के. ओंबासे तपास करत आहेत.

पोलिस सुरक्षा नाहीसह्याद्री एक्स्प्रेसच्या वेळेत सुरू केलेल्या कोल्हापूर पुणे विशेष एक्स्प्रेसला दररोज गर्दी असते. मात्र, या गाडीत रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त नसल्याने चोरट्यांनी हे कृत्य केले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूरPuneपुणेrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी