हरिप्रिया एक्स्प्रेसवर धारवाड स्थानकात दगडफेक, एक जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:13 IST2022-08-29T14:13:25+5:302022-08-29T14:13:52+5:30
सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही

हरिप्रिया एक्स्प्रेसवर धारवाड स्थानकात दगडफेक, एक जण ताब्यात
सांगली : कोल्हापूरहून तिरुपतीला निघालेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी (दि. २७) रात्री पावणेआठ वाजता धारवाड स्थानकात ही घटना घडली. याप्रकरणी सुरक्षा बलाच्या जवानांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.
कोल्हापुरातून दुपारी ११.४० वाजता सुटलेली हरिप्रिया एक्स्प्रेस ७.४५ वाजता धारवाडमध्ये पोहोचली. स्थानकात शिरत असताना १५ ते २० किलोमीटर प्रतितास इतका कमी वेग होता. यादरम्यान, प्लॅटफार्मच्या सुरुवातीलाच एका तरुणाने गाडीवर दगड भिरकावले. यामुळे एस १२ या स्लीपर बोगीच्या एका खिडकीची काच फुटली. दगडफेक वेगाने झाल्याने काचेचा चुराडा झाला. आतील प्रवाशांच्या अंगावर काचा उडाल्या. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. प्रवाशांनी रेल्वेच्या १३९ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर घटनेची माहिती दिली.