शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, महापालिकेच्या महासभेत मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:48 IST

अखेर महापालिकेने पुतळ्यासाठी जागा निश्चित केली

सांगली : शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक संघटनांकडून आंदोलन उभे केले होते. अखेर महापालिकेने पुतळ्यासाठी जागा निश्चित केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील महापालिकेच्या त्रिकोणी बागेत पुतळा उभारण्यावर गुरुवारी महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.महापालिकेची महासभा व स्थायी समिती सभा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नीलेश देशमुख, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, नीलेश जाधव, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा आयुक्त सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, सहदेव कावडे, नकुल जकाते उपस्थित होते.शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांनी आंदोलने केली होती. पुतळ्यासाठी प्रतापसिंह उद्यानातील जागाही निश्चित करण्यात आली, पण तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव बारगळला होता. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा हा विषय ऐरणीवर आला.अखेर महापालिकेच्या त्रिकोणी बागेत पुतळा उभा करण्याचा प्रस्ताव शहर अभियंत्यांना महासभेकडे दिला. त्याला गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभेत महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राकडे रक्त चाचण्यासाठी नवीन मशीन खरेदी करण्यात आले आहे. त्याबाबतचे दरही निश्चित करण्यात आले.स्थायी समितीत शुद्ध पाणी वितरणासाठी अत्याधुनिक वेब मॉनिटरिंग ऑटोमेशन व कंट्रोल सिस्टिम पुरविण्याची निविदा रद्द करण्यात आली. महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्यातून विविध कामांची ६०० कोटींची निविदा काढण्यात आली आहे. या कामासाठी नियुक्त निवृत्त अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना मुदतवाढ देण्यात आली.

ठेकेदार काळ्या यादीतमहापालिकेकडील आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत पाच ठिकाणी दवाखाने उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्थक मोटे या ठेकेदाराने निविदा भरली होती, पण त्यांनी निविदा मंजुरीनंतर सिक्युरिटी डिपॉझिटचा डी. डी, बँक गॅरंटी न दिल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या कामाची फेरनिविदा काढण्यात येणार आहे.