राष्ट्रीय कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर, सांगलीवाडीतील स्पर्धेतून निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:42 IST2025-01-07T17:42:07+5:302025-01-07T17:42:36+5:30
सांगली : सांगलीवाडी येथे झालेल्या मुख्यमंत्री चषक ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय ...

राष्ट्रीय कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर, सांगलीवाडीतील स्पर्धेतून निवड
सांगली : सांगलीवाडी येथे झालेल्या मुख्यमंत्री चषक ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर करण्यात आला. तासगावच्या आदित्य येसुगडे याची निवड करण्यात आली आहे.
सांगलीवाडीतील कबड्डी स्पर्धेत सर्वच संघांनी चुरसीने खेळ केला. निवड समितीने खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. हरिद्वार (उत्तराखंड) येथे ८ ते ११ जानेवारी अखेर राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.
कुमार गट संघ : अनुज गावडे (पुणे ग्रामीण), ओम कुदळे (मुंबई उपनगर पश्चिम), आदित्य पिलाने, रोहन तुपारे, अफताब अन्सारी (ठाणे शहर), असिम शेख (नंदूरबार), जयंत काळे (पुणे ग्रामीण), विजय तारे (परभणी), समर्थ देशमुख (कोल्हापूर), आदित्य येसुगडे (सांगली), राज मोरे (रायगड), महेश माने (पुणे ग्रामीण), प्रशिक्षक आयुब पठाण, संघ व्यवस्थापक प्रा. वैभव पाटील.
कुमारी गट संघ : वैभवी जाधव (पुणे ग्रामीण), भूमिका गोरे (पिंपरी-चिंचवड), प्रतीक्षा लांडगे (पुणे ग्रामीण), आरती चव्हाण (परभणी), मोनिका पवार (जालना), साक्षी रावडे, सृष्टी मोरे (पुणे ग्रामीण), साक्षी गायकवाड (पिंपरी-चिंचवड), कादंबरी पेडणेकर (मुंबई शहर पूर्व), श्रेया गावंड (ठाणे शहर), वैष्णवी काळे (अहिल्यानगर), रेखा राठोड (पिंपरी-चिंचवड), प्रशिक्षक महेंद्र माने, संघ व्यवस्थापक निकिता पवार.