शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:00 IST

प्रवाशांची सोय

सांगली : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने बुधवारी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सांगली व किर्लोस्करवाडीमार्गे विशेष एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.या विशेष गाड्या सांगली जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असून मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’ या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ घेणाऱ्या सांगलीकरांनी जाताना व येताना तिकिटावर सांगली स्थानकाचा उल्लेख करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अशा धावणार विशेष गाड्यामुंबई सीएसएमटी ते कोल्हापूर (गाडी क्र. ०१४१७) ही विशेष गाडी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मुंबई सीएसएमटीहून निघेल. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सांगली स्थानकावर येईल. ८:१० वाजता कोल्हापूरसाठी रवाना होऊन कोल्हापूरला १०:१५ वाजता पोहोचेल.कोल्हापूर ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र. ०१४१८) ही विशेष गाडी दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४:४० वाजता कोल्हापूर येथून निघेल. ५:४७ वाजता सांगली स्थानकावर पोहोचेल व ५:५० वाजता मुंबईकडे प्रयाण करेल. ही गाडी ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

याठिकाणी थांबे मंजूरदादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज अशी मधील स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

अशी आहे गाडीची रचना

  • एसी-३ टियर डबे : २
  • स्लीपर डबे : १२
  • जनरल सेकंड क्लास : ६
  • सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन २