मिरज : घरात मद्यपान व मांसाहारास सासूने विरोध केल्याने जावयाने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारून तिचे डोके फोडले. यात सासू मेघना किशोर क्षीरसागर या गंभीर जखमी झाल्या. मिरजेत खतीबनगर परिसरात ही घटना घडली. आरोपी जावई अक्षय रमेश कबाडे याच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री सुमारे अकरा वाजता अक्षय हा सासरी गेला होता. त्यावेळी त्याने घरात दारू पिण्यास व मांसाहार करण्यास सुरुवात केली. यावर मेघना यांनी विरोध करीत “दारू प्यायची व मांसाहार करायचा असल्यास घराबाहेर जाऊन करा,” असे बजावले.
या कारणावरून अक्षय याने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारला. यामुळे मेघना क्षीरसागर या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जावई अक्षय कबाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : In Miraj, a son-in-law assaulted his mother-in-law with a stone after she protested his drinking and eating meat inside the house. The injured woman is receiving treatment, and police have registered a case against the accused.
Web Summary : सांगली के मिरज में, एक दामाद ने अपनी सास के घर में शराब पीने और मांस खाने का विरोध करने पर पत्थर से हमला कर दिया। घायल महिला का इलाज चल रहा है, और पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है।