शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

..तर आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल, संजय विभुतेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:31 IST

जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी

सांगली : काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे नेतेच एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यांनी या तिरक्या चाली थांबविल्या नाहीत, तर बाजार समितीसह पुढील सर्व निवडणुका शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्रपणे लढवेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकसंध व मजबूत होत असताना जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. भाजप आणि मिंधे गट हा आमचा मुख्य शत्रू आहे. जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिरक्या चाली चालत आहे. त्यांनी ते बंद करावे. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी करावी. अन्यथा जिल्ह्यात शिवसेना या दोन पक्षांसोबत कधीही जाणार नाही.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनीच यावर तोडगा काढावा. महाविकास आघाडी एकदिलाने लढली तर बाजार समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करू शकतो. वेगळे लढलो तर भाजप आपल्याला संपवून टाकेल, असे स्पष्ट गणित आहे, असे ते म्हणाले.

तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावीजयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी एकदा ठरवून आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी. अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन किमान जिल्ह्यापुरते तरी स्वतंत्र लढू, असे विभूते म्हणाले.क्षीरसागर क्षुल्लकनियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर विभूते यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्हाला शिल्लक सेना म्हणणारे क्षीरसागर किती क्षुल्लक आहेत, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. ठाकरे कुटुंबाने त्यांना मानाची पदे दिले, आमदारकी दिली. ते खाल्ल्या घराचे वासे मोजत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस