बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 22:58 IST2026-04-13T22:57:08+5:302026-04-13T22:58:36+5:30

Sangli Crime News: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या कार्वेमध्ये एका २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. 

Sister abused, borewell worker Vijay Panse stabbed to death with sharp weapon, incident in Sangli district | बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 

बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 

विटा : बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून परप्रांतीय तरुणाचा धारदार चाकूने छातीत वार करून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कार्वे (ता. खानापूर) येथे घडली. 

विजय माणिक पानसे (वय २६, रा.बुरडाना, ता. बैजदई, जि. बैतुल, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून, रोशन यशवंत चौहान (वय २६, रा. राहठामाठी ता. बैजदई जि. बैतुल, मध्यप्रदेश) या संशयितास विटा पोलिसांनीअटक केली आहे. 

मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील विजय माणिक पानसे व रोशन यशवंत चौहान हे दोघे नातेवाईक आहेत. हे दोघेही माधवनगर येथील जयवंत नारायण देशमुख यांच्या कूपनलिका खोदणाऱ्या मशीनवर काम करायचे. संशयित चौहान हा ऑपरेटर असून मयत विजय पानसे हा कामगार आहे.

बहिणीला शिव्या, छातीवर केले वार

सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी २ वाजता हे दोघेही कार्वे येथील गट नंबर १८८ मध्ये असलेल्या विहिरीच्या बाजूला झाडाखाली जेवण करण्यासाठी बसलेले होते. त्यावेळी मयत विजय पानसे याने संशयित रोशन याच्या बहिणीस अश्लील शिवीगाळ केली.

त्यावेळी संशयित रोशन चौहान याने कांदा कापण्याच्या धारदार चाकूने विजय पानसे या तरुणाच्या छातीत वार केले. या हल्यात विजय पानसे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

आरोपीला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोर रोशन चौहान यास ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 

याप्रकरणी कूपनलिका गाडीचा मालक जयवंत नारायण देशमुख (रा. माधवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोशन चौहान याच्याविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित रोशन यास अटक केली आहे.

Web Title : सांगली: बहन को गाली देने पर बोरवेल कर्मचारी की हत्या

Web Summary : सांगली में, एक बोरवेल कर्मचारी को कथित तौर पर एक सहकर्मी की बहन को गाली देने के बाद चाकू मारकर हत्या कर दी गई। आरोपी को विटा पुलिस ने गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Well worker murdered over abuse of sister in Sangli.

Web Summary : In Sangli, a well worker was stabbed to death after allegedly abusing the sister of a colleague. The accused has been arrested by Vita police.