CoronaVirus धक्कादायक! सांगलीत सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 08:14 IST2020-04-19T08:14:33+5:302020-04-19T08:14:53+5:30
कोरोना रुग्णांची संख्या २७ वर; आणखी एक रुग्ण वाढला

CoronaVirus धक्कादायक! सांगलीत सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
सांगली : सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज येथील सहकारी बँकेत काम करणाऱ्या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे.
१७ एप्रिलला छाती भरल्याने त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. संशयावरून त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगलीत आता कोरोना रुग्णांची संख्या २७ वर गेली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. यामुळे सांगलीतील लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे.