मल्लिकार्जुन डोंगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:26+5:302021-02-20T05:20:26+5:30

कामेरी : श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाच्या वतीने मल्लिकार्जुन डोंगर विलास गड येथे शिवजयंती उत्साहात साजरी ...

Shiva Jayanti celebrations at Mallikarjun Dongar | मल्लिकार्जुन डोंगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मल्लिकार्जुन डोंगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कामेरी : श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाच्या वतीने मल्लिकार्जुन डोंगर विलास गड येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कोरोना नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मल्लिकार्जुन सेवा मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रशांत पाटील, दादासाहेब पाटील, विशाल शिंदे, विकास चौगुले, सागर पाटील, गणेश वडर, आशुतोष पाटील, पौर्णिमा पाटील, अनिता पुणेकर, कुमार गुरव व शिवभक्त उपस्थित होते. जगदंब ट्रेकर्सचे श्रीशैल चव्हाण, डॉ. विक्रांत पाटील, दिनेश पाटील, रणजित पाटील, अभय थोरात यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मल्लिकार्जुन डोंगरावर येण्याच्या पायऱ्या व मंदिर परिसरातील स्वच्छता करून आणि वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Mallikarjun Dongar