शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 15:15 IST2021-03-04T15:13:36+5:302021-03-04T15:15:33+5:30
NCP Sangli- शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे.

शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत
सांगली : शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे.
माने यांनी यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. महापालिकेत दोनवेळा ते नगरसेवक होते. सांगलीतील उपमहापौरगटाचे नेते म्हणून त्यांनी काम केले. या काळात पक्षाविना त्यांनी दबावगट स्थापन करुन महापालिकेच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता.
महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात माने यांनी स्वतंत्र छााप पाडली. महापूर, कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मदत केली होती. शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या व्यापारी संघटनेचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहेत.
गेल्या तीन वर्षापासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत होते. सांगली शहरातील अनेक युवा मंडळाचे नेतृत्व ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत शहरातील अनेक मंडळाचे युवक व शिवसेनेतील मोठा गटही आता राष्ट्रवादीशी जोडला जाणार आहे.
जयंत पाटील यांच्याकडून कौतुक
जयंत पाटील यांनी प्रवेशावेळी माने यांच्या महापौर, उपमहापौर निवडीतील योगदानाचे कौतुक केले. माने यांच्यासारख्या समाजकारण्यांमुळे पक्षसंघटन अधिक मजबुत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेखर माने म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आजवर आम्ही राबलो. आताही पक्षप्रवेशामागे शहर विकासाचा उद्देश आहे. शिवसेनेतही कोणत्याही पदाविना मी कार्यरत राहिलो. तिथेही अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादीतही शहरासाठी आवश्यक असलेली कामे व्हावीत, हीच अपेक्षा घेऊन आलो आहे.