शिराळा तालुक्यात 82.2 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:07 IST2019-07-27T12:06:56+5:302019-07-27T12:07:51+5:30

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 22.40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

In Shirala taluka, 82.2 min. M Rainfall record | शिराळा तालुक्यात 82.2 मि. मी. पावसाची नोंद

शिराळा तालुक्यात 82.2 मि. मी. पावसाची नोंद

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात 82.2 मि. मी. पावसाची नोंदवारणा धरणात 24.70 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 22.40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 13.6, जत 2, खानापूर-विटा 14.6, वाळवा-इस्लामपूर 30, तासगाव 11, शिराळा 82.2, आटपाडी झ्र निरंक, कवठेमहांकाळ 4.1, पलूस 19.8 व कडेगाव 34.

वारणा धरणात 24.70 टी.एम.सी. पाणीसाठा
    
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 24.70 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 58.67 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.67 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.51 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 12.75 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 7 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 118.55 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

  • कृष्णा पूल -कराड 13.3 (45),
  • आयर्विन पूल -सांगली 6.9 (40)
  • अंकली पूल -हरिपूर 7.10 (45.11).

 

Web Title: In Shirala taluka, 82.2 min. M Rainfall record