शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यातून पलायन केलेल्या महिलेस शिर्डीत अटक

By admin | Updated: June 14, 2016 23:58 IST

मासिक धर्माचा बहाणा : इस्लामपूर पोलिसांची शोधमोहीम

इस्लामपूर : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या कोल्हापूरच्या संशयित महिलेला अखेर पोलिसांनी तिसऱ्या दिवशी पकडले. शनिवारी पहाटे तिने मासिक पाळी आल्याचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर पोलिसांनी तिला शिर्डी येथे ताब्यात घेतले. पूनम संतोष माने-जाधव (वय २०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, कोल्हापूर) असे या पळून गेलेल्या महिलेचे नाव आहे. इस्लामपूर पोलिसांच्या कोठडीत असताना तिने शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. तिच्या शोधासाठी तिन्ही जिल्ह्यांत पथके रवाना झाली होती. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी विशेष पोलिस पथक रवाना केले. ही महिला व तिचा पती असे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रावण कांबळे यांच्या सोबत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. तसेच हे तिघे तिरूपतीला जात असल्याची हूल देऊन शिर्डीला गेल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील अवधूत इंगवले, अझहर शेख, सचिन कणप, संतोष देसाई, राजू पाटील, गजानन जाधव, महिला पोलिस अंजूम मुजावर यांनी साध्या वेशात सापळा रचून पूनमला ताब्यात घेतले. त्यापूर्वी पथकाने सांगली, मिरज, कोल्हापूर, वाठार, ढेबेवाडी, कऱ्हाड परिसरात शोधमोहीम राबवली होती. (वार्ताहर)