नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:09 IST2025-10-30T18:06:23+5:302025-10-30T18:09:05+5:30

Maharashtra Local Body Election Maharashtra: राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला. 

Sharad Pawar's NCP's first candidate for the mayoral election was announced, two names were in the discussion | नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 

Sharad Pawar NCP News: मागील काही वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या चाचपणीही सुरू झाली असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उरूण-इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची जयंत पाटील यांनी घोषणा केली. 

उरूण-इस्लामपूरचे नगराध्यक्ष पद यावेळी ओबीसी पुरूष प्रवर्गाला सुटले आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली होती. यात माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि डॉ. संग्राम पाटील यांची नावे चर्चेत होती. 

दरम्यान, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी मलगुंडे यांच्या नावाची घोषणा केली. 

'३१ पैकी २९ जागा जिंकून मिळवली होती सत्ता'

"मलगुंडे अजातशत्रू, मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेमधील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी बापूंना (राजाराम पाटील) मोठी साथ दिली. आपल्या पक्षाने १९८५ मध्ये ३१ पैकी २९ जागा जिंकून नगरपालिकेत सत्ता मिळवली होती", असे जयंत पाटील मलगुंडे यांचे नाव जाहीर करताना म्हणाले. 

"येत्या ४-६ दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होतील. कामाला लागा. गेल्या ९ वर्षात या शहरात काय विकास झाला? चालू होती ती कामे कशी बंद पडली? हे जनतेला सांगा. जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी", असे आव्हानही जयंत पाटील यांनी दिले. 

अजित पवारांची राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही सक्रीय झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे यांचे नाव जयवंत पाटील यांनी पुढे केले आहे. राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मन्सूर मोमीन यांच्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी हे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. 

Web Title : शरद पवार की राकांपा ने नगराध्यक्ष चुनाव के लिए पहला उम्मीदवार घोषित किया

Web Summary : राकांपा ने उरून-इस्लामपुर नगराध्यक्ष चुनाव के लिए आनंदराव मलुगुंडे को उम्मीदवार घोषित किया। जयंत पाटिल ने मलुगुंडे के नाम की घोषणा की, उनके अनुभव और निष्ठा पर प्रकाश डाला। अजित पवार की राकांपा संजय कोरे पर विचार कर रही है। मंसूर मोमिन के लिए चर्चा, इदरीस नायकवाड़ी का समर्थन।

Web Title : NCP Announces First Candidate for Urun-Islampur Nagaradhyaksha Election

Web Summary : NCP declared Anandrao Malgunde as their candidate for Urun-Islampur Nagaradhyaksha election. Jayant Patil announced Malgunde's name, highlighting his experience and loyalty. Ajit Pawar's NCP considers Sanjay Kore. Discussions surround Mansoor Momin, with Idris Nayakwadi's backing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.