शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

चंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:36 IST

: राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली एसटीला खराब मार्गांचा फटका बसतोय

सांगली : राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला.ते म्हणाले की, रस्त्यांमुळे निश्चितच एसटीला फटका बसत आहे. बसेस खराब होणे, प्रवाशांना त्याचा त्रास होणे व परिणामी एकूण उत्पन्नावर त्याचा परिणाम दिसत आहे. राज्यातील महत्त्वाचे रस्ते खराब असल्याबाबत आता मी सांगायची गरज नाही.

गडकरींनी स्वत:च मुंबई-गोवा महामार्गाबद्दल जाहीर वक्तव्य केले. अशा रस्त्यांची मला लाज वाटते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील रस्त्यांबाबत चंद्रकांत पाटील यांनी दखल घ्यावी. मुंबईतील रस्त्यांबाबत टीका केली जात असली तरी, आता त्याठिकाणी चांगले रस्ते केले आहेत. खराब रस्त्यांबाबत तातडीने दखल घेतली जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित रस्त्यांबद्दल दखल घ्यायला हवी. ही जबाबदारी ज्यांची असेल त्यांनी पहावे.भाजप नेत्यांनी शिवसेनेला गृहीत धरणे सोडावे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी शिवसेनेला विचारण्याची किंवा आम्ही नकार दिल्यानंतर त्याची चर्चा करण्याऐवजी स्वतंत्रपणे आम्ही लढत आहोत, हे त्यांनी गृहीत धरावे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर, शिवसेनेला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे या गोष्टीची आमची तयारी आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाबाबतही आम्ही आग्रही आहोत. भाजपला जर याबाबत श्रेय घ्यायचे असेल तर, त्यांनी घ्यावे, पण आरक्षण द्यावे. मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे त्यांनी संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.ईव्हीएम नको, बॅलेटच हवेराज्यात व देशात एकाचवेळी अनेक पक्षांनी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) तक्रारी केल्या आहेत. सर्वच पक्ष मतपत्रिकेबद्दल आग्रही आहेत. शिवसेनासुद्धा त्याच मताची आहे. आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून पार पाडल्या जाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे, असे रावते म्हणाले.सांगलीच्या स्टॅँडचा प्रश्न मार्गी लागेलसांगलीत नव्या जागेत एसटी स्टॅँड उभारण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यास प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा प्रश्न मार्गी लागेल, असे रावते म्हणाले.2

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलstate transportराज्य परीवहन महामंडळNitin Gadkariनितीन गडकरीSangliसांगली