शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST

मजुरांच्या पालीतील व्यथा : ऊस उत्पादन घटल्याने ६0 टक्के उत्पन्न बुडाले; तीन महिन्यात गावी परतावे लागणार

अविनाश कोळी ल्ल सांगलीकारखान्यांच्या धुराड्यांना यंदा घटलेल्या ऊसक्षेत्रानं लवकरच थंड करण्याचे गणित आखले असतानाच, हंगामाचा हा कडवटपणा आता ऊसतोडणी मजुरांच्या आयुष्यालाही चिकटला आहे. ६० टक्के उत्पन्नावर पाणी सोडून दरवर्षी सहा महिने मुक्कामाला येणाऱ्या मजुरांना आता तीन महिन्यांतच परतावे लागणार आहे.सांगलीत वसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस जवळपास पावणेतीनशे कुटुंबांनी पाली उभारल्या आहेत. उसाचे क्षेत्र घटल्याने मजुरांचे कामही कमी झाले आहे. पाच ते सहा महिन्यांत ज्यांच्या हाती लाख, सव्वालाख लागायचे, त्यांच्या हाती आता पन्नास हजार रुपये पडणेही मुश्किल झाले आहे. हंगामही लवकरच संपण्याची चिन्हे असल्याने यंदा जानेवारीच्या अखेरीस पाली उठून तांडे चालायला लागतील, अशी स्थिती आहे. मजुरांच्या पालींमध्ये यावर्षी घटलेल्या उत्पन्नामुळे चिंतेचा धूर पसरला आहे. हंगाम चांगला झाला नसल्याने वर्षभराचे त्यांचे अर्थचक्रही विस्कळीत होणार आहे. अनेक मजुरांनी गावाकडे पतसंस्था, बॅँका आणि सावकारांकडून कर्ज काढलेले असते. कर्जाची परतफेडही या हंगामावरच बरीचशी अवलंबून असल्याने त्यांना आता चिंता वाटू लागली आहे. दुष्काळी गावातून आलेल्या या मजुरांना नेहमीच उसाचा हंगाम साथ देत असतो. यावेळी हंगामाने फार कमी साथ दिली. हंगाम उशिरा चालू होऊन लवकर संपणार आहे. तोडणी कमी झाल्याने वैरण घटली आणि वैरण घटल्याने रोजचे चलनही थांबले आहे. आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला, हजारो मजुरांना चांगला वाटणारा हंगाम त्रासदायक वाटू लागला आहे. यापूर्वी दराच्या आंदोलनाचा भडका झाल्यानंतरही मजुरांना काही वाटले नव्हते. दराचा तोडगा निघाल्यानंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येत होती. आता उत्पादनच नसल्याने परिस्थिती सुधारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. धुराडे बंद पडताना चिंतेची काजळी आता त्यांच्या पालींवर पडणार आहे. जीवनाचं चक्र...एकवेळच्या स्वयंपाकात तीनवेळचा पोटोबा करून भल्या पहाटे फडात कष्टाचे गाणे गाणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांच्या सांगलीतील पाचमाही मुक्कामातच त्यांच्या वर्षभराच्या जगण्याचे अर्थकारण दडले आहे. त्यांच्या जीवनाची चाकं साखरपट्ट्याशी बांधली गेली असली, तरी सव्वातीनशे किलोमीटरमधील त्यांची जगण्याची कसरत पिढ्यान् पिढ्या तशीच आहे.