शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सांगलीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू, झोपेतच दंश : सापास पकडून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:03 PM

गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवास्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगलीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यूझोपेतच दंश : सापास पकडून मारले

सांगली : गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवासस्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.केदारचे वडील किरण चव्हाण हे महावितरणमध्ये वायरमन पदावर नोकरीस आहेत. यवलूज (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे त्यांचे मूळ गाव आहे. दोन वर्षापूर्वी चव्हाण यांची सांगलीला बदली झाली होती. ते महावितरण कार्यालय परिसरातील निवास्थानात ते कुटूंबासह राहत होते.

केदार रात्री दहा वाजता जेवण करुन झोपी गेला होता. पहाटे तो गाढ झोपेत असतानाच अचानक किंचाळत उठला. त्याच्या आई, वडिलांनाही जाग आली. तेवढ्यात मोठा साप तेथून दुसऱ्या खोलीत गेला.

केदारला सापाने दंश केल्याचे लक्षात आले. तो जोरजोराने ओरडू लागला. त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असताना केदारचा मृत्यू झाला. विच्छेदन तपासणीनंतर केदारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विषारी सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कर्मचाऱ्यांची धावकेदारला सर्पदंश झाल्याचे समजताच निवासस्थानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. केदारला दंश केलेला सर्प निवास्थानातील घरातच लपून बसला होता. कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून ठार मारले. केदार पहिलीत शिकत होता. तो एकूलता एक होता. तिच्या मृत्यूने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगलीwildlifeवन्यजीव