सांगलीत पित्याचा मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:33 PM2017-09-19T23:33:42+5:302017-09-20T00:24:12+5:30

सांगली : जन्मदात्या पित्यानेच गेल्या चार वर्षांपासून स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला

Sangli's father's daughter raped | सांगलीत पित्याचा मुलीवर बलात्कार

सांगलीत पित्याचा मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देचार वर्षे अत्याचार : माहिती देऊनही नातेवाईक गप्प; अखेर मुलीची पोलिसात धावतुझी व घराण्याची अब्रू जाईल, तुझा विवाह करुन देतो, अशी तिची समजूत घालण्यात आली.तब्बल चार वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जन्मदात्या पित्यानेच गेल्या चार वर्षांपासून स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. संशयित पिता एसटी महामंडळात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत आहेत. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही.

पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या पित्याने दुसरा विवाह केला. मुलगी १७ वर्षांची असल्यापासून पित्याने तिच्यावर अत्याचार सुरू केला. ‘मी तुला जन्माला घातले आहे, त्यामुळे माझा तुझ्यावर अधिकार आहे’, असे म्हणून गेली चार वर्षे तो मुलीवर अत्याचार करीत आहे. ही घटना कोणाला सांगितल्यास तुझा सख्खा भाऊ व तुझ्या सावत्र आईचा सांभाळ करणार नाही, अशी तो धमकी देत होता. तिने बाहेर कोणाला हा प्रकार सांगू नये, यासाठी तो मुलीला घराबाहेरही पडू देत नव्हता. मुलीने संधी मिळेल त्यावेळी नातेवाईकांना, वडील करीत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली; पण नातेवाईकांनीही या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. तुझी व घराण्याची अब्रू जाईल, तुझा विवाह करुन देतो, अशी तिची समजूत घालण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी वडिलांची एका मोठ्या शहरात बदली झाली. दुसºया पत्नीला सोबत घेऊन जाण्याऐवजी त्याने मुलीला सोबत नेले. तिथे मुलगी एका ठिकाणी नोकरीस लागली. मात्र त्याने तिला नोकरी सोडायला लावली. तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. पित्याच्या अत्याचाराला ती कंटाळली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या नात्यातील एक पोलिस अधिकारी तिला भेटला. त्यालाही त्याने हा प्रकार सांगितला; परंतु नातेवाईक पोलिस अधिकाºयानेही घरची अब्रू जाईल, अशी भीती घालून तिला गप्प राहण्यास सांगितले.

कोणीच मदतीसाठी येत नसल्याचे लक्षात येताच ही मुलगी चार दिवसांपासून गायब होती. तिच्या नातेवाईकांनी सोमवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहर पोलिस व निर्भया पथकाने या मुलीचा शोध सुरू ठेवला होता. रात्री बारा वाजता ती सावत्र आईच्या घरी सापडली.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, गेली चार वर्षे पित्याने केलेल्या अत्याचाराचा पाढा तिने वाचला. त्यानंतर पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. पीडित मुलीची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

आठवड्यातील दुसरी घटना
पित्याने मुलीवर अत्याचार केल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात पित्याने तीन वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे करून तिची मोबाईलवर चित्रफीत काढली होती. ही घटना ताजी असतानाच, मंगळवारी एका मुलीच्या पित्याने तब्बल चार वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयित पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अजूनही अटक केलेली नाही. त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना केले आहे. तो ५४ वर्षांचा असून, एसटी महामंडळात वरिष्ठ अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे.

Web Title: Sangli's father's daughter raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.