Sangli ZP Election Results 2026: खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दिला भाजपला धक्का

By अविनाश कोळी | Updated: February 9, 2026 12:50 IST2026-02-09T12:49:50+5:302026-02-09T12:50:20+5:30

शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना धक्का दिला

Sangli ZP Election Results 2026 Shinde Sena MLA Suhas Babar gave a shock to BJP in Khanapur taluka | Sangli ZP Election Results 2026: खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दिला भाजपला धक्का

Sangli ZP Election Results 2026: खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दिला भाजपला धक्का

विटा : खानापूर तालूक्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी थेट लढत होती. खानापूरचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना धक्का दिला आहे. पाचव्या फेरीअखेर शिंदेसेनेचे चारपैकी तीन गटातील तर आठपैकी सहा गणातील उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार एका गटात तर दोन गणात आघाडीवर आहेत. अद्याप चार फेऱ्यांचे निकाल बाकी आहेत. 

भाजपच्या करंजे गटातील उमेदवार प्रिया पाटील या सध्या आघाडीवर असल्या तरी याठिकाणी चूरस पहायला मिळत आहे. याच गणातून भाजपचे उमेदवार शिवाजी मानेही आघाडीवर आहेत. एकूणच चार गट व आठ गणातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात शिंदेसेना भाजपवर भारी पडताना दिसत आहे. 

दोन मित्रपक्षांच्या लढाईत शिंदेसेना बाजी मारताना दिसत आहे. आमदार सुहास बाबर यांच्याविरोधात या तालुक्यात भाजपचे सर्व नेते एकवटले होते. त्यामुळे ही लढत लक्षवेधी बनली होती. बाबर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेने सत्तांतर घडवून आणले होते. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिंदेसेनेला यश मिळताना दिसत आहे. विरोधी भाजपचे नेते वैभव पाटील यांच्या समर्थकांच्या पदरी निराशा आली आहे.

Web Title : सांगली ZP चुनाव: खानापुर में शिंदे सेना के बाबर ने बीजेपी को दिया झटका

Web Summary : खानापुर में, शिंदे सेना के विधायक सुहास बाबर ने सांगली ZP चुनावों में बीजेपी को चौंका दिया। पांच दौर के बाद शिंदे सेना अधिकांश समूहों में आगे है। बीजेपी के उम्मीदवार कम क्षेत्रों में आगे हैं। सहयोगियों के बीच लड़ाई पर कड़ी नजर रखी जा रही है।

Web Title : Sangli ZP Election: Shinde Sena's Babar Deals Blow to BJP in Khanapur

Web Summary : In Khanapur, Shinde Sena's MLA Suhas Babar surprised BJP in the Sangli ZP elections. Shinde Sena leads in most groups after five rounds. BJP candidates lead in fewer areas. The battle between allies is closely watched.