Sangli ZP Election Results 2026: भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी

By संतोष भिसे | Updated: February 9, 2026 13:15 IST2026-02-09T13:14:26+5:302026-02-09T13:15:28+5:30

पहिल्याच निवडणुकीत साईतेजस्वी देशमुख यांनी मारली बाजी 

Sangli ZP Election Results 2026 Sai Tejaswi Deshmukh daughter of BJP MLA Satyajit Deshmukh from Shirala wins | Sangli ZP Election Results 2026: भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी

Sangli ZP Election Results 2026: भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी

सांगली : शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी विजयाचा गुलाल उधळला. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. विदेशात शिक्षण घेतलेल्या साईतेजस्वी यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. 

आमदार देशमुख यांनी कन्येच्या विजयासाठी ताकद लावली होती. त्याला यश आले असून साईतेजस्वी या विजयी झाल्या आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिलीच निवडणूक लढवली होती. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपनेते सम्राट महाडिक यांसारख्या स्थानिक भाजप नेत्यांनीही त्यांना ताकद दिली होती. विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सभापती राहिलेल्या शिवाजीराव देशमुख यांच्या त्या नात आहेत.

Web Title : सांगली ZP चुनाव: बीजेपी विधायक सत्यजित देशमुख की बेटी विजयी

Web Summary : बीजेपी विधायक सत्यजित देशमुख की बेटी साईतेजस्वी देशमुख ने जिला परिषद चुनाव जीता। अपने पिता और स्थानीय बीजेपी नेताओं द्वारा समर्थित, यह उनका पहला चुनाव था। वह कोकरुड निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व करती हैं और शिवाजीराव देशमुख की पोती हैं।

Web Title : Sangli ZP Election: BJP MLA Satyajit Deshmukh's Daughter Wins

Web Summary : Saitajaswi Deshmukh, daughter of BJP MLA Satyajit Deshmukh, won the Zilla Parishad election. Supported by her father and local BJP leaders, this was her first election. She represents the Kokrud constituency and is the granddaughter of Shivajirao Deshmukh.