शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

By अविनाश कोळी | Updated: February 9, 2026 11:49 IST

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का; भाजपच्या पदरी निराशा, कडेगाव तालुक्यात एक जागा वगळता सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

सांगली : कडेगाव तालुक्यातील कडेपूर पंचायत समिती गण वगळता सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतही सरस कामगिरी केली असून एकत्र आलेल्या पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख या बंधुंना धक्का दिला आहे. कडेगाव तालुक्यापुरता मर्यादित नसलेला हा निकाल सांगली जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. मागील निवडणुकीत भाजपने चारपैकी तीन जिल्हा परिषद गटांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर आठपैकी सहा पंचायत समिती गणात भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे भाजपसमोर आपले वर्चस्व टिकवण्याचे, तर काँग्रेससमोर पुन्हा सत्ता मिळवण्याचे मोठे आव्हान होते. माजी आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने संपूर्ण तालुक्यात प्रचारयंत्रणा राबवली. दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांनी संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे व मागील यशाचा आधार घेत भाजपनेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या लढाईत काँग्रेसनेच बाजी मारल्याचे सध्याचे चित्र आहे. कडेपूर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस व भाजप उमेदवारात चूरस असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election 2026: Congress Leads, Setback for BJP

Web Summary : In Sangli ZP elections, Congress leads in most constituencies, dealing a blow to BJP. Vishwajit Kadam's leadership proves effective. While BJP tried retaining power, Congress aims to reclaim it. All eyes are now on Kadepur result.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीBJPभाजपाcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदम