सांगली : जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमधील १२२ गणांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादीत ६० हजार ६८५ दुबार मतदार आढळले आहेत. दुबार मतदारांना फक्त एका ठिकाणी मतदान करण्याची परवानगी राहणार आहे. यासाठी दुबार मतदारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.प्रत्येक गट आणि गणासाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली होती. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीसाठी सुमारे १८ लाख १८ हजार ७२३ मतदार आहेत. मतदानासाठी २,३७० केंद्रे निश्चित केली आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदारयादीत सुमारे ६० हजार ६८५ दुबार मतदार आहेत. एकसारखी नावे किंवा फोटो असल्याने दुबार मतदारांची ओळख पटते.जिल्ह्यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक दुबार मतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिराळा तालुका आहे. आटपाडी तालुक्यात सर्वांत कमी दुबार मतदार आहेत. दुबार मतदारांच्या आकडेवारीत अजूनही बदल होऊ शकतो. प्रशासनाकडून दुबार मतदारांची माहिती घेतली जात आहे. कोणत्या ठिकाणच्या यादीत नाव ठेवायचं, याची विचारणा करून त्याबाबतचा अर्ज दुबार मतदारांकडून भरून घेतला जात आहे.
तालुकानिहाय दुबार मतदारांची संख्यातालुका / दुबार मतदार संख्याआटपाडी / २,४००जत / ४,१३१खानापूर / २,७५५कडेगाव / ४,७७१तासगाव / ७,३२२कवठेमहांकाळ / ३,३४४पलूस / ३,८२१वाळवा / १२,९५१शिराळा / ११,२९२मिरज / ७,८९८एकूण / ६०,६८५
जिल्ह्यात जवळपास ६० हजार ६८५ दुबार मतदारांची संख्या आहे. या मतदाराचे एकाच ठिकाणी मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. एकाही मतदाराचे दुबार मतदान होणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे. म्हणूनच दुबार मतदारांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे मतदार दोनपैकी एकाच ठिकाणी मतदान करू शकतात. - सतीश कदम, उपजिल्हाधिकारी
Web Summary : Sangli ZP election on February 5th reveals 60,685 duplicate voters. They'll vote at one chosen location. Walwa has the most, Atpadi the fewest. Administration ensures single voting.
Web Summary : 5 फरवरी को सांगली जिला परिषद चुनाव में 60,685 दोहरे मतदाता पाए गए। वे एक ही चुने हुए स्थान पर मतदान करेंगे। वालवा में सबसे अधिक, अटपाडी में सबसे कम। प्रशासन एकल मतदान सुनिश्चित करता है।