शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

 सांगली : चिंचणीतील शिवस्मारकाचे काम पूर्ण, लवकरच उदघाटन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:33 IST

चिंचणी तालुका कडेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक साकारले आहे.या स्मारकाचे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे .यामुळे शिवछत्रपतींचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे आकर्षण व प्रेरणास्थान ठरत आहे .या शिवस्मारकाचा उदघाटन व लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.

ठळक मुद्देचिंचणीतील शिवस्मारकाचे काम पूर्ण, लवकरच उदघाटन सोहळाअश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे प्रेरणास्थान

कडेगाव :चिंचणी तालुका कडेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक साकारले आहे. या स्मारकाचे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शिवछत्रपतींचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे आकर्षण व प्रेरणास्थान ठरत आहे. या शिवस्मारकाचा उदघाटन व लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे .भावी पिढीला स्फूर्ती मिळावी यासाठी पाच वर्षांपूर्वी सन २०१३ मध्ये सागरेश्वर सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या संकल्पनेतून चिंचणी येथे शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा निर्धार येथील शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांनी केला.

माजी मंत्री स्व. आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीची शासन मान्यता मिळाली. १ जानेवारी २०१५ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले. पुतळा समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली.नागपूर येथील पॉवर ग्रीड फाउंडेशनच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी परिसर सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला तसेच आमदार फंडातून विद्युत रोषणाईसाठी ६ लाख रुपयांचा निधी दिला.  

पुणे येथील बी. आर. खेडकर या प्रसिद्ध मुतीर्कारांनी १० फूट उंचीचा आणि ४ टन वजनाचा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा साकारला .गावातील शिवप्रेमी तरुणांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून १८५० किलोमीटर धावत २० एप्रिल २०१५ रोजी शिवज्योत गावात आणली.

याच दिवशी पारंपारिक शिवजयंतीची औचित्य साधून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० लाख रुपये इतक्या निधीतून येथील शिवस्मारकाचे काम आता पूर्ण झाले आहे. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणी आणि चौक सुशोभीकरण व विद्युत रोषणाई आदी कामे पूर्ण झाल्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे .राजकिय नेतेमंडळींडुन कौतुकआमदार मोहनराव कदम, आमदार डॉ.विश्वजीत कदम व सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी येथील शिवस्मरकाचे दर्शन घेऊन या आदर्शवत कामाचे कौतुक केले .चिंचणीचे वैभव आणि ग्रामस्थांचा उत्साह ग्रामपंचायत स्तरावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे ऐतिहासिक काम चिंचणी येथे झाले. येथील आकर्षक शिवस्मारक गावचे वैभव ठरत आहे .यामुळे शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण आहे .

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSangliसांगली