सांगली : बलात्कारप्रकरणी अंकलखोपच्या तरुणास दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:32 IST2018-10-20T16:31:02+5:302018-10-20T16:32:05+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सांगली : बलात्कारप्रकरणी अंकलखोपच्या तरुणास दहा वर्षे सक्तमजुरी
सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटनेकर यांनी शनिवारी हा निकाल दिला. खटल्याची हकीकत अशी, सुनील गायकवाड हा पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पण मुलीने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने मुलीस तिच्या वडील व भावास जीवे मारण्याची धमकी देत स्वतःच्या घरी बोलवले. तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला.
मोबाईलवर तिचे अश्लील फोटो काढले. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत, प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास जबरदस्ती करू लागला. त्याचा या त्रासाला कंटाळून मुलीने भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले.