शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले, अनेक दिग्गजांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:52 IST

महापालिकेत शिंदेसेनेची एन्ट्री

सांगली : राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे बहुमत केवळ एका जागेने हुकले. या निवडणुकीत भाजपला ३९, काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३, तर शिंदेसेनेला २ जागा मिळाल्या. धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखत मतदारांनी अनेक दिग्गजांचा पराभव केला. यात भाजपचे शहर जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. अनेक प्रभागांत क्राॅस व्होटिंग झाल्याने चार सदस्यांच्या पॅनेलला धक्का बसला.महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्का कमी म्हणजे ६१.०३ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा कौल कुणाला, याची उत्सुकता होती.या निवडणुकीत भाजप महायुतीत फूट पडली. राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या, तर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आघाडी करीत भाजपसमोर आव्हान उभे केले होते. आघाडीतील उद्धवसेना व मनसेही युती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार डाॅ.विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या सभांनी निवडणुकीचे रान तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्याही झडल्या होत्या.

वाचा : वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजीशुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरजेतील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. प्रभाग १, ३, ५, ९, १२, १५ या सहा प्रभागांची प्रथम मतमोजणी झाली. दोन फेऱ्यांत झालेल्या मतमोजणीत मतांचे आकडे कमी-जास्त होत होते. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढत चालली होती. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर प्रभागाच्या मतमोजणी झाली. शेवटी प्रभाग १६ व १९ या दोन प्रभागांची मतमोजणी झाली.गत निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणली होती, पण यंदा भाजपला दोन जागांचा फटका बसला. भाजपचा रथ ३९ जागांवर अडखळला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीने भाजपला बालेकिल्ल्यात रोखले. प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपला धक्का दिला. या प्रभागात केवळ एकाच जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, तर गावभागमधील प्रभाग १४ च्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपला एक जागा गमावावी लागली. त्यामुळे बहुमताचे स्वप्न भंगले.काँग्रेसने १८ तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही यंदा चांगले यश मिळाले असून, ते तिसऱ्या स्थानी राहिले. या पक्षाला १६ जागा मिळाल्या, तर शिंदेसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले. यंदा अनेक प्रभागात क्राॅस व्होटिंगही झाले. त्याचा फटका पक्षाच्या अधिकृत पॅनेलला बसला. प्रभाग १०, १४, १६, १७, १९ या प्रभागातील क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसला.महापालिकेत शिंदेसेनेची एन्ट्रीमहापालिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत एन्ट्रीसाठी झगडावे लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत शिवसेनेचा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. यंदा मात्र, शिंदेसेनेने दोन जागा पटकावत पुन्हा महापालिकेत एन्ट्री घेतली आहे. शिंदेसेनेकडून प्रभाग एकमधून सागर व्हनखंडे आणि प्रभाग १४ मधून युवराज बावडेकर विजयी झाली. या दोघांनीही भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.

पक्षीय बलाबल

  • भाजप - ३९
  • काँग्रेस - १८
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - १६
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - ३
  • शिंदेसेना - २
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: BJP Misses Majority, Key Leaders Lose in Shocking Results.

Web Summary : In Sangli Municipal elections, BJP missed a majority by one seat. BJP won 39, Congress 18, NCP (Ajit Pawar) 16, NCP (Sharad Pawar) 3, and Shinde Sena 2. Many prominent leaders, including BJP officials, were defeated amid cross-voting.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा