शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

सांगली महापालिका निवडणूक; टक्का घसरला; चिंता प्रशासन अन् पक्षांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 11:15 PM

सांगली : महापालिकेसाठी बुधवारी ६२.१७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा एक ते सव्वा टक्का मतदान घटले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या उपक्रमांतून मतदान वाढीसाठी प्रयत्न केले, पण ते प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. मोठे प्रभाग असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील प्रचार रंगला नाही. त्यातून मतदारांत निरुत्साह होता. या साऱ्याचा परिपाक मतांचा ...

सांगली : महापालिकेसाठी बुधवारी ६२.१७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा एक ते सव्वा टक्का मतदान घटले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या उपक्रमांतून मतदान वाढीसाठी प्रयत्न केले, पण ते प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. मोठे प्रभाग असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील प्रचार रंगला नाही. त्यातून मतदारांत निरुत्साह होता. या साऱ्याचा परिपाक मतांचा टक्का घसरण्यात झाला असावा, असे मत विविध क्षेत्रातील मंडळी व्यक्त करू लागली आहेत.महापालिकेच्या २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २ लाख ४८ हजार ११२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ६३.४२ इतकी होती. काँग्रेस, राष्ट्रवादी व काही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. त्या लढतीत काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी प्रशासनाने मतदार जागृतीसाठी फारसे प्रयत्न केले नव्हते. तरीही यंदाच्या तुलनेत जादा मतदान झाले होते.यंदा मात्र प्रशासनाने निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान जागृतीची मोहीम हाती घेतली होती. शहरातील प्रत्येक चौकात भलेमोठे डिजिटल फलक लागले होते. मतदार जागृतीसाठी वाजत-गाजत आणि पावसात भिजत वरिष्ठ अधिकाºयांनी रॅली काढली होती. प्रसारमाध्यमातून वारंवार आवाहनही केले जात होते. पथनाट्यातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. तरीही मतदार घराबाहेर पडू शकला नाही, हे अपयश प्रशासनाचे म्हणावे लागेल. प्रचारात भपका होता, पण प्रत्यक्षात मतदारांपर्यंत प्रशासन पोहोचू शकले नाही, असेच सध्याच्या टक्केवारीवरून दिसून येते. दुसरीकडे यंदा चारसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाची रचना भलीमोठी होती. प्रचारात ईर्षा कुठेच दिसत नव्हती. मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. अगदी बहुरंगी लढती रंगल्या, पण मतदाराला घराबाहेर काढून मतदान करवून घेण्यात राजकीय पक्षही कमी पडले. प्रभागाचा विस्तार वाढल्याने तेरा दिवसात घररोघरी पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलवले नाही. त्याचा परिणाम टक्केवारीवर झाल्याचे सांगण्यात येते.सुशिक्षित भागात मतदान कमीमतदानाची आकडेवारी पाहता, उच्चभ्रू-सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाºया प्रभागात मतांची टक्केवारी कमी असल्याचे जाणवते. ‘हार्ट आॅफ दि सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाºया विश्रामबाग परिसरातील प्रभाग १७ व प्रभाग १९ या दोन्हीमध्ये अनुक्रमे ५४ व ५६ टक्के मतदान झाले आहे.