सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:38 IST2025-06-27T12:38:20+5:302025-06-27T12:38:40+5:30

बांधकाम परवान्यासाठी मागितली होती ७ लाख रुपयांची लाच

Sangli Municipal Corporation Deputy Commissioner Vaibhav Sable suspended, Urban Development Department takes action in bribery case | सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

सांगली : सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना नगरविकास विभागाने निलंबित केले.

एका चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. उपायुक्त साबळे यांनी इमारतीला बांधकाम परवाना देण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तानाजी रुईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याप्रकरणी साबळे यांना अटक झाली. 

महापालिका तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी नगरविकास विभागाला अहवाल सादर केला होता. त्यावर नगरविकास विभागाने साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस कोठडीत स्थानबद्ध केल्याच्या दिनांकापासून म्हणजे ९ जूनपासून निलंबित केले आहे.

Web Title: Sangli Municipal Corporation Deputy Commissioner Vaibhav Sable suspended, Urban Development Department takes action in bribery case