शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सांगली : मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू : अजित नवले, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुधाचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:22 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दूधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही.

ठळक मुद्देसांगली : मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू : अजित नवलेभाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुधाचे मोफत वाटप

सांगली : राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दूधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही.

येत्या ३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची दखल न घेतल्यास मुंबई, पुण्यासह मोठ्या शहराचा दूधपुरवठा रोखला जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.नवले म्हणाले की, येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. या संपावेळी व लाँगमार्चवेळी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत आश्वासन दिले होते. पण त्याची पुर्तता केलेली नाही.

कर्जमाफीसह काही मागण्यांच्या अंमलबजावणीत सरकारने एक पाऊल पुढे टाकले असले तरी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यवाहीवर शेतकरी समाधानी नाही. या आंदोलनादरम्यानच सरकारने दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. पण गेली वर्षभर दूधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या दुधाचा दर लिटरला १६ ते १७ रुपये इतका आहे. हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही.दुसरीकडे सरकार मात्र दुधाचा महापूर आल्याचे सांगत आहे. ते पूर्णत: चुकीचे आहे. शेतकऱ्यांकडून गायी व म्हैशीचे ३.५, ८.५ फॅटचे दूध संकलन करून त्याचे तिप्पट उत्पादन दूध संघातून सुरू आहे.

शहरी लोकांना केवळ १.५ फॅटच्या दूधाचे वितरण केले जाते. दूधाची अतिरिक्त निर्मिती ही दूध संघातून होत आहे. त्याला सरकारचे पाठबळही आहे. दूधाचे उत्पादन, वितरण व इतर उत्पादने याची कसलीही आकडेवारी सरकारकडे नाही. आवक कमी व पुरवठा जादा अशी विसंगत परिस्थिती आहे.

त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कोसळल्याने दूध संघाकडून पावडरची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात दूधाचा अतिरिक्त पुरवठा दिसून येतो. पण हे सत्य सांगण्याचे धाडस भाजप सरकारकडे नाही. त्यासाठी समविचारी संघटनांना सोबत घेऊन दूध उत्पादक संघर्ष समिती स्थापन केली आहे.या समितीच्यावतीने येत्या ३ ते ९ मे दरम्यान मोफत दूध वाटप करून सत्याग्रह आंदोलन केले जाईल. शरम नसेल तर मोफत दूध न्या, लुटता कशाला मोफत न्या, असे ठरावही ग्रामसभेतून केले जाणार आहेत. या आंदोलनाची दखल भाजप सरकारने घेतली नाही तर मोठ्या शहराचा दूध पुरवठा रोखला जाईल. अगदी परराज्यातून होणारा दूध पुरवठाही बंद करू, असा इशारा नवले यांनी दिला.

दहा कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे संकलनशेतीमालाला हमी भाव व स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी देशस्तरावरील शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्र करून देशव्यापी लढ्याची तयारी सुरू आहे. त्यातून दहा कोटी शेतकऱ्यांच्या सह्या संकलन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रातून २० लाख शेतकऱ्यांच्या सह्या घेतला जातील. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येईल. त्यानंतरही त्याची दखल न घेतल्यास देशव्यापी आंदोलन हाती घ्यावे लागले, असेही नवले म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाmilkदूधFarmerशेतकरी