शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

सांगली : शेखरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला, पाहावयास मिळाले पावलांचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:53 PM

शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देसांगली : शेखरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढलापाहावयास मिळाले पावलांचे ठसे

ऐतवडे बुद्रुक : शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. गेल्या १५ दिवसांत वाटेगाव, चिकुर्डे, कार्वे, ढगेवाडी, मरळनाथपूर, रेड, ऐतवडे बुद्रुक येथेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबतची माहिती अशी, शेखरवाडी येथील अशोक राबाडे यांच्या शेतातील शेडमध्ये अभ्यास करीत बसलेले विद्यार्थी सुशांत राबाडे, गणेश राबाडे व प्रवीण राबाडे यांना रात्री १0 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तत्काळ गावातील लोकांशी संपर्क केला. थोड्याच वेळात अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ग्रामस्थांची गर्दी वाढल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी संदीप शेखर व इतर शेतकऱ्यांना इंग्रूळ-शेखरवाडी दरम्यानच्या डोंगरामध्ये बिबट्या दिसला होता. तसेच कार्वे येथील बाबूराव शिंदे, जयसिंग पानिरे, योगेश पाटील, आदी शेतकऱ्यांना शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. येथील डोंगरवाडी, इंग्रुळ, कार्वे, कापरी, शेखरवाडी, ढगेवाडी, मरळनाथपूर, रेड, ऐतवडे बुद्रुक गावांच्या परिसरात विस्तीर्ण असा डोंगर आहे. त्यामुळे या भागात बिबट्या लपण्यास जागा उपलब्ध असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.या परिसरातील ग्रामस्थांनी यापूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्यासंबंधी माहिती दिली होती; परंतु वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी गहू, हरभरा, शाळूची काढणी केली जाते.

विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे दिवसा, तसेच रात्री पिकांना पाणी देण्यास शिवारात जावे लागते; परंतु बिबट्याच्या भीतीमुळे अनेकांनी रात्री शेतात जाणेच बंद केले आहे. दरम्यान, संदीप शेखर व ग्रामस्थांनी सांगितले की, परिसरातील भटकी कुत्री बिबट्याचे मुख्य खाद्य आहे. कारण अनेक भटकी कुत्री व शेतकऱ्यांची पाळीव कुत्रीही या बिबट्याने फस्त केली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघ