शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सांगली : शोभेच्या दारु स्फोटात कवठेएकंदला मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:56 PM

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ऐतिहासीक विजयदशमीच्या सोहळ्याला शोभेच्या दारुच्या आतषबाजी करीत असताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल (वय १२) हा शाळकरी मुलगा ठार झाला.

ठळक मुद्देशोभेच्या दारु स्फोटात कवठेएकंदला मुलगा ठारघटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ऐतिहासीक विजयदशमीच्या सोहळ्याला शोभेच्या दारुच्या आतषबाजी करीत असताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल (वय १२) हा शाळकरी मुलगा ठार झाला. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद आहे.कवठेएकंद येथे विजयदशमी (दसरा) उत्साहात साजरी केली यानिमित्त शोभेच्या दारुची आतषबाजी केली जाते. गुरुवारी रात्रीपासून गावात शोभेच्या दारुची मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुरु होते. ही आतषबाजी रात्रभर सुरु राहिली. पहाटे साडेचार वाजता प्रणव घराजवळ शोभेच्या दारुची आतषबाजी करीत होता.

कागदी शिंगट्याची आतषबाजी करीत असताना ते अचानक फुटून जोरात स्फोट झाला. त्याचा दटट्या डोक्याला लागल्याने प्रणव अंगणात कोसळला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पण उपचार सुरु असताना काही तासातच त्याचा मृत्यू झाला.

तासगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रवण कवठेएकंदमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. सकाळी अकारा वाजता गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :fireआगAccidentअपघात