शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे इंटरनेट स्पीड मुंबई, पुणे, बंगळुरू अन् हैदराबाद सारखाच; व्यावसायिकांची आयटीमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:36 IST

संतोष भिसे सांगली : काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगलीची इंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होती; पण खासगी नेट कंपन्यांमुळे येथील इंटरनेट सेवेला स्पीड ...

संतोष भिसेसांगली : काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगलीचीइंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होती; पण खासगी नेट कंपन्यांमुळे येथील इंटरनेट सेवेला स्पीड मिळाले आहे. मुंबई-पुण्याइतकेच स्पीड आता सांगलीतही मिळते. आयटी कंपनी सुरू करण्यासाठीची अत्यंत मूलभूत गरज पूर्ण झाल्याने येथे कंपन्या सुरू होऊ शकतात. त्यासाठी प्रशासकीय आणि शासकीय स्तरावर थोड्याफार बूस्टची गरज आहे.सांगलीत आयटी पार्कसाठी पुरेशा सवलतीने जमीन उपलब्ध व्हायला हवी. विविध करांमध्ये सवलती मिळायला हव्यात. अखंडित वीजपुरवठादेखील आवश्यक आहे. सरकारी परवानग्यांमधील लाल फितीचा अडसर लोकप्रतिनिधींनी दूर करायला हवा. इतक्या सोयी-सुविधा मिळाल्यास आयटी कंपन्यांचे प्रवर्तक सांगलीकडे वळतील हे निश्चित. चांगल्या कंपन्या आल्यास पुणे-मुंबई किंवा अन्य शहरांकडे धाव घेणारे पदवीधर येथेच थांबतील. सध्या प्रत्येक शुक्रवारी रात्री पुण्याहून सांगलीकडे धाव घेणारे आणि शनिवार-रविवारची सुटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे परत पुण्याकडे धाव घेणारे शेकडो आयटीयन्स पुणे-बंगळुरू महामार्गावर दिसतात.पुण्यातील आयटी कंंपनीत नोकरी म्हणजे चैनी असा समज असलेले सांगलीकर त्यांच्या हालअपेष्टांपासून अनभिज्ञ आहेत. सांगलीत पार्क सुरू झाल्यास हेच तरुण तुलनेने कमी पॅकेजमध्ये येथेच थांबतील. पॅकेज कमी मिळाले, तरी कुटुंबासोबत राहता येईल हा त्यांच्यासाठी लाखमोलाचा फायदा ठरतो. यातील अनेकजण आजही तीन दिवस वर्क फ्रॉम होम, तर तीन दिवस वर्क इन ऑफिस असे काम करत आहेत. काही तरुण तर वर्ष-वर्षभर वर्क फ्रॉम होम करत आहेत. हा विचार करता आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांची छोटी कार्यालये सांगलीतील पार्कमध्ये सुरू होऊ शकतात.

सांगली जिल्ह्यातील अनेक उद्योगांनी आयटीविषयक आपल्या गरजा भागविण्यासाठी स्वत:चे आयटी सेल सुरू केले आहेत. प्रसिद्ध चितळे उद्योग समूह, गाडगीळ सराफ पेढी, काही बँका यांचे स्वत:चे आयटी विभाग कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी गुंतवणूकही केली आहे. सांगलीत आयटी पार्क सुरू झाल्यास असे मोठे उद्योग तेथून सेवा घेतील. त्यांना स्वत:चे पैसे मोठ्या प्रमाणात गुंतवून ठेवावे लागणार नाहीत.

सांगलीची बलस्थाने कोणती?

  • चांगले हवामान आणि वैद्यकीय सेवा
  • रेल्वे आणि महामार्गांची उपलब्धता
  • मोठ्या संख्येने पदवीधर तरुणांची उपलब्धता
  • पुणे-मुंबईच्या तुलनेत अत्यंत स्वस्त राहणीमान
  • पुणे-मुंबईच्या तुलनेत जागांचे भाव ७० टक्क्यांपर्यंत कमी
  • स्वस्त मनुष्यबळ, वाहतूक कोंडीची समस्या नाही
  • सांगलीचे जीवनमान तुलनेने ताणतणावमुक्त

सांगलीचे कच्चे दुवे कोणते?

  • विमानतळासाठी कोल्हापूर किंवा बेळगाववर अवलंबून
  • सांगलीच्या बलस्थानांच्या मार्केटिंगचा अभाव
  • सांगलीच्या लोकप्रतिनिधींमध्ये आयटी पार्कबाबत अनास्था
  • सांगली व्हिजनमध्ये आयटी पार्कविषयी फक्त चर्चाच
टॅग्स :SangliसांगलीITमाहिती तंत्रज्ञानInternetइंटरनेट