शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:11 IST

मुंबई, पुण्यालाही टाकले मागे : हवेत धूलिकणांचे प्रमाण समाधानकारक

सांगली : सांगली सर्वांत आरोग्यदायी शहर ठरले आहे. जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी कमी असून, सर्वाधिक आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचे निरीक्षण प्रदूषण मंडळाने नोंदविले आहे. चांगल्या हवेने सांगलीकरांचे आयुष्यमानही चांगले ठरले आहे.सांगलीकरांच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मापदंडानुसार ० ते ५० (२.५ पीएम) या स्तरातील हवा सर्वांत चांगली समजली जाते. येथील पर्यावरणात भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या संख्येने असतात, तसेच औद्योगिक संस्थाही हवेत कार्बनडाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइडसारख्या वायूंचे हवेत उत्सर्जन टाळण्यासाठी प्रयत्न करतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण नियंत्रित असते. त्यामुळे प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते. सांगली, कोल्हापुरातील हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. या जिल्ह्यांचा समावेश आरोग्यदायी शहरांमध्ये होतो.५१ ते १० या इंडेक्समधील हवा समाधानकारक समजली जाते. राज्यातील ११ शहरे या इंडेक्समध्ये बसतात. त्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पिंपरी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जालना, सोलापूर यांचा समावेश आहे. तेथील नागरिकांना आरोग्याचा धोका नसून शुद्ध हवेत श्वास घेता येतो. दमा, ब्राँकॉयटिससारखे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता फारच कमी असते.रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसच्या ॲटलास एक्यू प्लॅटफाॅर्मवरील एका अभ्यासात सांगलीच्या आरोग्यदायी हवेचा अभ्यास नोंदविण्यात आला आहे. त्यासाठी ३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीतील हवेचा अभ्यास करण्यात आला. ३१ शहरांच्या तुलनेत सांगलीची हवा शुद्ध आणि आरोग्यदायी असल्याचे आढळले. हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोजण्यात आले असता ते पीएम २.५ म्हणजे समाधानकारक आढळले. सांगली शहर हवेच्या गुणवत्तेत चांगल्या श्रेणीत, तर अन्य शहरे समाधानकारक श्रेणीत आढळली. कल्याण, चंद्रपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरेदेखील स्वच्छ हवेची आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीpollutionप्रदूषणHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषण