शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यामध्ये केवळ ३० टक्केच पाणीसाठा, अकरा प्रकल्प पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:58 IST

गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या प्रकल्पात तीन हजार ६४९.१४ दशलक्ष घनफूट पाणी असून उपयुक्त पाणीसाठा केवळ ३० टक्केच आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी आहे. दहा तलाव कोरडे तर २१ पाझर तलावात मृत पाणीसाठा असून ते कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.पाच मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही या प्रकल्पांमध्ये तीन हजार ६४९.१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास ते ३० टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे.पावसाळ्यातच आटपाडी तालुक्यातील पाच, कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन, तासगाव तालुक्यातील दोन प्रकल्प कोरडे ठणठणीत असल्याचा सांगली पाटबंधारे विभागाचा अहवाल आहे. जिल्ह्यातील २१ प्रकल्पांतील पाणीसाठा मृतसाठ्यापेक्षा कमी आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांत केवळ २५ टक्के तर १९ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.पाच प्रकल्पांमध्ये ७५ टक्के तर चार तलावांमध्येच शंभर टक्के पाणीसाठा आहे. पाच शंभर टक्के भरलेल्या प्रकल्पांपैकी चार शिराळा व एका वाळवा तालुक्यातील प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास ते केवळ ३० टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत ३६ टक्के पाणीसाठा होता.

जिल्ह्यात ८४ टक्के पेरणी

जिल्ह्यात जुलै महिन्यात १०० टक्के पेरणी होत होती. पण, पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ ८४ टक्केच पेरणी झाली आहे. मिरज तालुक्यात ६५.९ टक्के, जतमध्ये ९१.१ टक्के, खानापूर ५५.५ टक्के, वाळवा ९८.५ टक्के, तासगाव ८३.३ टक्के, शिराळा १००.२ टक्के, कवठेमहांकाळ ९०.२ टक्के, पलूस ९६.८, कडेगाव ६९.८ टक्के तर आटपाडी तालुक्यात केवळ ४८.५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठातालुका - एकूण साठा - सध्याचा साठा - टक्केवारीतासगाव - ७०८.९९ - २८०.२९ - २८खानापूर - ६६३.०४ - २८८.०७ - ३४कडेगाव - ७६४.५० - ३९९.१५ - ४३शिराळा - १०७१.३२ - १०२६.५२ - ९५आटपाडी - १३६७.३६ - ३७७.३१ - २०जत - ३६२८.४७ - ९६२.४६ - १७क.महांकाळ - ९५६.५० - २२५.५६ - १४मिरज - १४१.६५ - ६५.८४ - ३७वाळवा - ५१.७३ - २३.९४ - ४३एकूण - ९४४०.२० - ३६४९.१४ - ३०

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी