शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या ५०७ कर्मचारी भरतीस अखेर स्थगिती, सहकार अवर सचिवांचे आदेश; या कंपनीतर्फे भरती करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:50 IST

दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करा : सदाभाऊ खोत

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरती प्रकरणी राज्य सरकारने मोठा झटका दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५०७ जागांच्या नोकरभरतीला स्थगिती देत, नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकार विभागाच्या अवर सचिव मंजूषा साळवी यांनी बँकेला दिले आहेत. आयबीपीएस आणि टीसीएस कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया पुन्हा राबविण्याच्या सूचना शासनाने गुरुवारी दिल्या आहेत.सहकार विभागाच्या अवर सचिव मंजूषा साळवी यांनी सहकार आयुक्त पुणे यांना आदेश काढल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत गुरुवारी स्पष्ट केले. जिल्हा बँकेतील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, यासाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) आणि टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमार्फत भरती परीक्षा घेतली जावी, अशी मागणी आमदार खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

लिपिक उमेदवारांसाठी २० ते २५ लाख रुपये आणि शिपाई उमेदवारांसाठी १२ ते १५ लाख रुपये इतक्या रकमांचा दर असल्याचा आरोपही खोत यांनी केला होता. यापूर्वी २०११ साली झालेल्या नोकरभरतीत अनेक मोठे गैरव्यवहार झाले होते, ज्याची चौकशीही पूर्ण करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नोकरभरतीमध्ये पात्र व योग्य उमेदवार निवडणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या संचालकांच्या शिफारशीनुसार नोकर भरती होऊ नये, अशीदेखील मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नोकरभरतीला स्थगिती देत नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे बँकेच्या संचालकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करा : सदाभाऊ खोतसदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांकडे थकीत रक्कम असेल तर त्यांच्यावर बोजा बसतो. तसेच दोषी संचालकांच्या घरांवरही बोजा लावावा. यापूर्वी या दोषींना पुन्हा कधीही निवडणुका लढवता येऊ नयेत, अशी कारवाई झाली पाहिजे.’ त्यांनी नमूद केले की, बोगस संस्था काढून सुमारे ४०० जणांनी बोगस कर्ज उचलले आहे. या कागदी संस्थांना मतदानासाठी नोंदण्यात आले आहे, त्यांना अपात्र ठरवून निवडणुका होऊ द्याव्यात, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशीही मागणी त्यांनी केली.शासन आदेशात काय म्हटले आहे?जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीपीएस किंवा टीसीएस या कंपन्यांमार्फत नोकरभरती करण्याचे आदेश देत, चालू असलेली पदभरती प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यास सांगितले आहे. नोकरभरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक २१ डिसेंबर २०२२ चा निर्देशानुसार आयबीपीएस किंवा टीसीएसपैकी एखाद्या कंपनीची निवड करण्याबाबत राज्य सरकारने बँकेला कळवले आहे.

जिल्हा बँकेत नोकरभरतीच्या पदांचा तपशीललिपिक पदे : ४४४शिपाई पदे : ६३एकूण : ५०७

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bank recruitment halted; IBPS, TCS to conduct fresh process.

Web Summary : Sangli District Bank's 507 employee recruitment faces stay. Government orders fresh process via IBPS/TCS due to transparency concerns raised by MLAs. Allegations of corruption surrounded the process.