शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

सांगली : माळवाडीमध्ये बंगला फोडून पाच लाखाचा मुद्देमाल लंपास, जैन मंदिरातील दानपेटीही फोडली : नागरिकांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:57 PM

माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटनेमुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.

ठळक मुद्देजैन मंदिरातील दानपेटीही फोडली नागरिकांत भीतीचे वातावरणसुरेश अण्णासाहेब भानुसे पुलाची शिरोली (जि. कोल्हापूर) येथे शिक्षक

दुधगाव : माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटनेमुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.सुरेश अण्णासाहेब भानुसे पुलाची शिरोली (जि. कोल्हापूर) येथे शिक्षक आहेत, तर त्यांची पत्नी संपदा या माळवाडी येथे शिक्षक आहेत. येथील शशिकांत शामराव मसुटगे यांच्या बंगल्यात ते भाडेकरू म्हणून राहतात.

भानुसे मूळचे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील आहेत. बुधवारी काही कामानिमित्त ते कुंभोज येथे गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ७८ हजार असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला.यानंतर चोरट्यांनी जैन मंदिराकडे मोर्चा वळविला. मंदिरातील दानपेटीही फोडली. यामधील नोटा घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दानपेटीतील चिल्लर मात्र तशीच ठेवली. दुसऱ्यादिवशी सकाळी संपदा घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पती सुरेश भानुसे यांना बोलावून घेतले.

यानंतर भानुसे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत चोरीची फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण भानुसे यांच्या घरापासून कुलकर्णी यांच्या शेतातून जुन्या सावळवाडी रस्त्यापर्यंत जाऊन श्वास घुटमळले.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा