शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

खारी, टोस्ट, सॅंडविच ब्रेड, केकचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:36 PM

food Sangli-खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देखारी, टोस्ट, सॅंडविच ब्रेड, केकचे दर वाढलेबेकरी व्यावसायिक संघटनेचा भावढीचा निर्णय

सांगली : खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.खारी, टोस्ट, पाव, सँडविच ब्रेड, बिस्कीटे ही मोठ्या खपाची उत्पादने किलोमागे सरसकट २० ते ३० रुपयांनी महागणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशनच्या मंगळवारी (दि. २३) झालेल्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाला. खजिनदार नाविद मुजावर म्हणाले की, खाद्यतेल आणि डिझेलच्या दरवाढीचा बोजा आवाक्याबाहेर गेल्याने दरवाढ करावी लागत आहे.

सर्वच कच्च्या साहित्याची ५० ते ७० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. तेल, वनस्पती तूप, डिझेल, पॅकिंग साहित्य महागल्याने सध्याच्या दरात उत्पादने देणे शक्य नाही. त्यामुळे २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ लागू केली आहे. यावेळी प्रवीण पाटील, कृष्णराव माने, फिरोज केपी, असिफ भोकरे, संजू नायर आदी बेकरी व मिठाई उत्पादक उपस्थित होते. बेकरीसाठी सध्या डिझेल किंवा विद्युत भट्ट्यांचा वापर होतो. डिझेल नव्वदीपर्यंत पोहचल्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला आहे.वनस्पती तूप २००० रुपयांवरकाही वस्तुंची दरवाढ अशी : वनस्पती तूप १५ किलोचा डबा १४०० रुपयांवरुन २००० रुपये. डिझेल ६८ रुपये लिटरवरुन ८९ रुपये. पामतेलाचा १५ किलोंचा डबा १०३० रुपयांवरुन २००० ते २१०० रुपये. सरकी तेल १५ किलोचा डबा २३०० रुपये. पॅकिंगचे प्लास्टीक १६० रुपये किलोवरुन २५० रुपये किलोवर. महागाईने उत्पादन खर्चात ५० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे.खारी २२० रुपये तर ब्रेड २५ रुपयेनव्या दरवाढीनुसार १८० रुपयांच्या एक किलो खारीसाठी आता २१० ते २२० रुपये मोजावे लागतील. २०० ग्रामचा सँडविच ब्रेड २० रुपयांवरुन २३ ते २५ रुपयांवर जाईल. टोस्ट १४० रुपये किलोप्रमाणे मिळायचे, आता १६० ते १८० रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय केक, बर्गर पाव, बिस्कीटे, नानकटाई, शेव यांचे दरही किलोमागे २० ते २५ रुपये वाढणार आहेत.

टॅग्स :foodअन्नSangliसांगली