शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य विक्रीला; स्वस्तात होतेय खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कायम असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुरते बाधित झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कायम असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुरते बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत असले तरी हेच धान्य आता विकलेही जाऊ लागले आहे. गेल्यावर्षी पोलिसांनी राईस मिलवर कारवाई, तांदूळ पकडला असला तरी आता मात्र, लाभार्थींकडेच धान्य अधिक झाल्याने अनेकजणांनी विक्रीचा फंडा अवलंबवला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह राज्य शासनाकडूनही लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत दिले जात आहे. कुटुंबातील सदस्य संख्या कमी असल्याने अनेकांकडे धान्य शिल्लक राहत आहे. त्यामुळे अगदी नाममात्र किमतीत या धान्याची विक्री होते आहे. प्रशासनाला याबाबत कारवाई करण्यासही अडचणी येत आहेत.

चौकट

इडली, डोसासाठी तांदूळ

इतर कोणत्याही तांदळापेक्षा रेशनच्या तांदळापासून इडली व डोसा चांगला तयार होत असल्याची भावना असल्याने अनेकजण केवळ यासाठी तांदूळ विकत घेत आहेत, तर काही दुकानदार गहू इतर गव्हांमध्ये मिक्स करण्यासाठी खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

चौकट

जादाचे धान्यामुळे अडचण

शासनाकडून दुर्बल घटकांना नियमितपणे धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात खंड न पडल्याने अनेक जणांकडे धान्याची साठवणूक झाली आहे. हे धान्य खराब होण्यापेक्षा त्याची विक्री करण्यात येत आहे.

चौकट

गव्हाऐवजी ज्वारी

लाभार्थ्यांना गहू वाटप होत असले तरी प्रत्यक्षात अनेकजण चपातीऐवजी भाकरी खाणेच पसंत करतात. त्यामुळे काही लाभार्थी गव्हाची विक्री करून त्यातून ज्वारीची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

कोट

शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा त्यांच्यासाठी होत असला तरी त्याची विक्री करणे चुकीचे आहे. त्याशिवाय या धान्याचा गैरवापर करणाऱ्यावर यापूर्वी कारवाई झाली आहेत यापुढेही तथ्य आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी.