महापालिकेचे अग्निशमन कार्यालय हलविण्यास सत्ताधारी भाजपचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:29 IST2020-12-10T13:28:25+5:302020-12-10T13:29:06+5:30
MuncipaltyCarporation, Bjp, Sangli सांगली महापालिका प्रशासनाने अग्निशमन कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. त्याला सत्ताधारी भाजपच्या महिला सदस्यांनी गुरुवारी विरोध केला.

महापालिकेचे अग्निशमन कार्यालय हलविण्यास सत्ताधारी भाजपचा विरोध
ठळक मुद्देमहापालिकेचे अग्निशमन कार्यालय हलविण्यास सत्ताधारी भाजपचा विरोधनगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन
सांगली : महापालिका प्रशासनाने अग्निशमन कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. त्याला सत्ताधारी भाजपच्या महिला सदस्यांनी गुरुवारी विरोध केला.
नगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती गीताजंली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.