सांगली जिल्ह्यात ४६ ठिकाणी अपघाताचा धोका, ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी बांधकाम विभागाकडे सुपुर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:42 IST2025-12-19T16:42:26+5:302025-12-19T16:42:52+5:30
एसटीच्या आगारांनी आपापल्या क्षेत्रातील सर्व्हे करू विविध मार्गांवरील ४६ अपघात क्षेत्रांची नोंद केली आहे

सांगली जिल्ह्यात ४६ ठिकाणी अपघाताचा धोका, ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी बांधकाम विभागाकडे सुपुर्द
प्रसाद माळी
सांगली : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील दहाही आगार क्षेत्रांमधील अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व १० आगारांनी आपापल्या क्षेत्रातील सर्व्हे करू विविध मार्गांवरील ४६ अपघात क्षेत्रांची नोंद केली आहे. या क्षेत्रांची यादी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठविण्यात आली असून, त्या ठिकाणी करावयाच्या सूचना सांगली विभागाकडून पाठविण्यात आल्या आहेत.
एसटीच्या सांगली विभागाने जिल्ह्यातील विविध मार्गांवर एसटीचे वारंवार अपघात झाले आहेत. ती ठिकाणे अपघात क्षेत्रे म्हणून निश्चित केली आहेत. त्यांची यादी तयार करून त्या ठिकाणी करावयाची दुरुस्तीची सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. संबंधित मार्गांवरील ब्लॅक स्पॉट हटण्याची प्रतीक्षा आता एसटीला करावी लागणार आहे.
‘ब्लॅक स्पॉट’ची निश्चिती
एखाद्या ठिकाणी एसटीचा जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अपघात होतो तेव्हा ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात येते. जिल्ह्यातील यादी निश्चित करून व संबंधित क्षेत्रात करावयाच्या सूचना बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचवले आहे. त्या क्षेत्रात सूचनांची अंमलबाजवणी झाल्यावर ते ठिकाण संबंधित यादीतून काढण्यात येते.
अपघात क्षेत्र सुधारण्यासाठी केलेल्या सूचना
एसटीने सुचवलेल्या सूचनांमध्ये रस्ता रुंदीकरण, चौक रुंदीकरण, गतिरोधक, मार्गदर्शक फलक, वाढलेली झाडे काढणे, रस्ता दुरुस्ती, खड्डे बुजवणे, बोध चिन्हे, दिशादर्शक, तीव्र उतार कमी करणे, वेडीवाकडी वळणे काढणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
आगार क्षेत्रनिहाय मार्ग व अपघात प्रवण ठिकाण
मार्ग / ठिकाण
सांगली
सांगली-कोल्हापूर/आदिसागर मंगल कार्यालय
सांगली-कोल्हापूर/मिरज फाटा अंकली
सांगली-मिरज/वॉलचंद कॉलेज
सांगली-इस्लामपूर/मिणचे मळा, तुंग
मिरज
मिरज-पंढरपूर/तासगाव फाटा
मिरज-पंढरपूर/तानंग फाटा
मिरज-पंढरपूर/बालाजी मंगल कार्यालय
मिरज-सांगली/सोरटूर कॉर्नर, मिशन हॉस्पिटल
मिरज-मालगाव/लक्ष्मी मार्केट, दिंडीवेस
मिरज-म्हैसाळ/नदिवेस, म्हैसाळ स्टँड
मिरज स्टँड रोड/मिरज बसस्थानक प्रवेशद्वार
तासगाव
तासगाव-खानापूर/गोटेवाडी फाटा
तासगाव-खानापूर/हातनूर भालेखडा
तासगाव-सावळज/सावर्डे फाटा-लोढे
तासगाव-मिरज/कुमठा फाटा
तासगाव-मणेराजुरी/वासुंबे फाटा
विटा
कडेगाव-तोंडाली/ताेंडोली
कडेगाव-खेराडे वांगी/सासपडे
जत-विजयपूर/मुचंडी
जत-सांगली/सुभेदार चढ
जत-उमदी/उमदी बसस्थानक
जत ते सांगोला/गंध ओढा
आटपाडी
भिवघाट-आटपाडी/गोमेवाडी हायस्कूल कदम वस्ती बसथांबा
खरसुंडी-मिटकी/खरसुंडीपासून २ किमी अंतरावर
आटपाडी बाह्यवळण व आबानगर पोलिस ठाणे चौक/आटपाडी आगार गेट व पंचायत समिती गेटमधील रस्ता
कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ-जत/लिंबेवाडी फाटा
कवठेमहांकाळ बसस्थानक/आगाराचे प्रवेशद्वार व बाहेर पडणारे द्वार
कवठेमहांकाळ-सांगली/नागज फाटा
कवठेमहांकाळ-सांगली/नूतन कॉलेज नरसिंहगाव, शिरढोणच्या पूर्वेकडील बायपास व पी. व्ही. पी. कॉलेज
कवठेमहांकाळ-जत/जुने बसस्थानक
शिराळा
शिराळा-बांबवडे/सांगाव रोड, नाथ फाटा
शिराळा-मणदूर/बिऊर विठ्ठल नगर
शिराळा-मणदूर/सोनवडे हायस्कूल बसथांबा
शिराळा-खुंदलापूर/येळापूर खिंड
शिराळा-वाकुर्डे/अंत्री बु. ओढ्याजवळ
पलूस
पलूस-दुधोंडी/किर्लोस्करवाडी ते दुधोंडी
पलूस-पुणदी/किर्लोस्करवाडी ते पुणदी
पलूस-आंधळी/भोसलेनगर, सूतगिरणी जवळ
पलूस-आंधळी/पद्मानगर, आशीर्वाद बार जवळ
पलूस-किर्लोस्करवाडी/नवीन बसस्थानक ते जि. प. शाळा
तासगाव-कराड/विटा फाटा
कराड-तासगाव/येळावी, बांबवडे फाटा
कराड-तासगाव/येळावी फाटा, पाचवा मैल