शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी उद्या घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना ...

सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना भरपाईपोटी एक रुपयाचीही मदत झालेली नाही. शासनाने तातडीने मदत द्यावी, यासाठी बुधवारी गणरायाला घंटानाद करून साकडे घातले जाणार असल्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी सोमवारी सांगितले.

सर्वपक्षीय कृती समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला माजी आ. नितीनराजे शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अश्रफ वांकर, राजकुमार राठोड, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, महेश पाटील, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, रेखा पाटील, राहुल पाटील, अविनाश जाधव, अभिमन्यू भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, सॅमसन तिवडे, आकाश तिवडे आदी उपस्थित होते.

साखळकर म्हणाले की, सांगली शहरासह जिल्ह्याला जुलै महिन्यात महापुराचा फटका बसला. लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पूरग्रस्त नागरिकांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली; पण आता दीड महिना लोटला तरी एक रुपयाचेही अनुदान जमा झालेले नाही. शासनाकडून रेशनवर धान्य, व्यापाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणाच झाली. शासनाला जाग आणण्यासाठी आणि सुबुद्धी द्यावी, यासाठी बुधवारी गणपती मंदिरासमोर घंटानाद करून गणेशाला साकडे घातले जाणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले.