शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिलाचे पुनर्भेट, वनविभागाची बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:04 IST

विकास शहा शिराळा : गिरजवडे (ता. शिराळा) येथील शिवारात सापडलेल्या बिबट्याच्या २२ दिवसांच्या पिलाची वनविभागाने त्याच्या आईसोबत भेट घडवून ...

विकास शहाशिराळा : गिरजवडे (ता. शिराळा) येथील शिवारात सापडलेल्या बिबट्याच्या २२ दिवसांच्या पिलाची वनविभागाने त्याच्या आईसोबत भेट घडवून आणली. मादी बिबट्या तीन पिलांचे स्थलांतर करताना एक पिल्लू शिवारातच राहिले होते. त्याला रविवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मादी घेऊन गेली.शनिवारी (दि. १७) सायंकाळी सहाच्या सुमारास पिलांचे स्थलांतर करताना लोकांची चाहूल लागल्याने मादी निघून गेली. त्यामुळे एक पिल्लू तेथेच राहिले. याची माहिती शेतकऱ्यांनी वनरक्षक स्वाती कोकरे यांना दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, कोकरे, बचाव पथकाचे सदस्य संतोष कदम, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, धीरज गायकवाड यांनी पिलाच्या सुटकेची मोहीम राबवली. पाऊस जोरात असल्याने पिलाच्या सुरक्षित राहण्याची सोय केली. मादीचा शोध घेतला असता, ती जवळच जंगलात वास्तव्याला असल्याचे दिसले.

रात्री दीड वाजता पिलाला नेलेपिलाला नेण्यासाठी मादी येत नसल्याने त्याच्या मृत्यूचा धोका होता. त्यामुळे त्याला शिराळा येथे वनविभागाच्या कार्यालयात आणून ठेवले. रविवारी सायंकाळी पुन्हा मूळ ठिकाणी नेऊन ठेवले; पण त्या रात्रीही मादीने पिलाला नेले नाही. सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान बचाव पथक पुन्हा तेथे गेले असता पिल्लू जागेवर दिसले नाही. कॅमेऱ्यांतील चित्रण पाहिले असता रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान मादीने पिलाला नेल्याचे दिसून आले.

बिबट्यांची बचाव मोहीमयापूर्वीही शिराळा वनविभागाने पाडळी, तडवळे, शिरसी, वाटेगाव, टाकवे, निगडी, बांबवडे, नेर्ले येथे बिबट्याच्या पिलांना त्यांच्या आईच्या स्वाधीन केले आहे. कार्वे व ऐतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यांची सुटका केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग