शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांच्या दहशतीमुळे माघार : जयंत पाटील

By admin | Updated: November 9, 2016 00:45 IST

या जागेची निवडणूक स्थगित करावी

 सांगली : गुंडांच्या दहशतीमुळे इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराने माघार घेतली आहे. याबाबत पोलिसप्रमुखांना कल्पना देऊनही त्यांनी काहीही केले नाही. दहशतीच्या जोरावर बिनविरोध झालेल्या या जागेची निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या आई सौ. सुशिला आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी दाखल झाल्यापासूनच विरोधी पक्षाच्या लोकांनी पाठविलेले गुंड शिवाजी पवार यांना धमकावत होते. त्यांच्यामागे परजिल्'ातील गुंडांकडून पाळत ठेवण्यात आली होती. प्रचंड दहशतीच्या जोरावर त्यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले आहे. पक्षीय कार्यालयात भेटून शिवाजी पवारांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. त्याचबरोबर जिल्हा पोलिस प्रमुखांनाही, या सुरू असलेल्या गुंडगिरीबद्दल कल्पना दिली होती. शिवाजी पवार यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची तसेच संबंधित गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. तक्रार दाखल केल्यानंतरच याबाबतची कार्यवाही करण्याची भूमिका पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केली. गुंड अनोळखी असल्याने पवार यांनी तक्रार कोणाविरुद्ध द्यायची?, असा प्रश्न होता. पोलिसांनी वेळीच याप्रकरणी दखल घेतली असती, तर आमच्या उमेदवाराने माघार घेतली नसती. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे सर्वत्र निघत आहेत. इस्लामपुरात सर्रास मटका सुरू आहे. मटक्यातून आलेल्या पैशाद्वारे गुंडगिरी फोफावली आहे. त्याचा पहिला फटका नगरपालिका निवडणुकीत बसला आहे. आयोगाकडे तक्रार करणार इस्लामपुरातील प्रभाग क्र. १० मधील निवडणूक गुंडगिरीच्या जोरावर बिनविरोध केल्याने, राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत. निवडणुकीला स्थगिती देऊन, काही कालावधीने फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.