शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेत सेवानिवृत्त लोकांना थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

ओळी : अंकलखोप येथे शिक्षक संघाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरात जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ...

ओळी : अंकलखोप येथे शिक्षक संघाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरात जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. सदस्य नितीन नवले, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेत सेवानिवृत्त लोकांना थारा नको. बँक ही सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चालवावी, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी केले.

अंकलखोप येथे शिक्षक संघाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य नितीन नवले उपस्थित होते. पाटील म्हणाले की, सध्या शिक्षक बँकेत सेवानिवृत्त नेत्यांची ढवळाढवळ जास्त आहे. त्यामुळे नेत्यांची मर्जी सांभाळताना सभासद हिताकडे दुर्लक्ष होत आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा असल्याने शिक्षकांप्रती माझ्या मनात नेहमीच आदर असतो. माझे वडील स्व. लालासाहेब पाटील हे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे शिक्षक संघ या संघटनेशी जुने नाते आहे.

जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, शिक्षक बँकेतील भ्रष्ट कारभारास सभासद कंटाळला आहे. संगणक दुरुस्ती, नोकरांचे बोनस, पगार यावर लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. आगामी निवडणुकीत सभासद सत्तांतर केल्याशिवाय राहणार नाहीत.

यावेळी सरचिटणीस अविनाश गुरव, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांची भाषणे झाली. सुरुवातीला शिक्षक बँकेचे संस्थापक दाजी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पार्लमेंटरी बोर्डाचे नेते अरुण पाटील यांनी प्रास्ताविक तर संजय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य, शिक्षक बँकेचे संचालक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.