शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

राज्यातील गृहरक्षक दलाचे जवान तडकाफडकी सेवामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 1:00 PM

पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना गृहखात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता १० जानेवारीपासून सेवेतून मुक्त केले आहे. अतिशय तोकड्या भत्त्यावर काम करणाऱ्या जवानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देराज्यातील गृहरक्षक दलाचे जवान सेवामुक्तहोमगार्ड संघटनेकडून काम देण्याची मागणी

अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना गृहखात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता १० जानेवारीपासून सेवेतून मुक्त केले आहे. अतिशय तोकड्या भत्त्यावर काम करणाऱ्या जवानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.पोलीस दलाला सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र गृहरक्षक दल स्थापन करण्यात आले आहे. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, ईद, मोहरम, मोठ्या यात्रा व निवडणुकीत त्यांना काम दिले जात होते. राज्यात ५६ हजार, तर सांगली जिल्ह्यात १२०० जवान कार्यरत आहेत. त्यांना कर्तव्य बजावत असताना प्रतिदिन ६७० रुपये भत्ता दिला जातो. मात्र त्यांना दररोज काम दिले जात नव्हते.जुलै २०१९ मध्ये गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून १८० दिवस काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार कामाचे नियोजन केले जात होते. प्रत्येक जवानाचे १८० कामाचे दिवस भरतील असे गट तयार केले होते, परंतु १० जानेवारीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी या जवानांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.गृहरक्षक दलाचे जवान खासगी आस्थापना, शेतमजुरी, पहारेकऱ्यांचे काम सांभाळून कर्तव्य पार पाडत असतात. वर्षभर काम मिळेल व भविष्यात पगार वाढेल, या आशेवर ते होते. मात्र एका फटक्यात त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यांना त्वरित कामावर हजर करून घ्यावे, कर्तव्य भत्ता प्रतिदिन १००० रुपये करावा व १८० दिवस काम देण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होमगार्ड संघटनेकडून वारंवार होत आहे. तरीही त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिसSangliसांगली