शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव शहरात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. वाढती रुग्ण संख्या धोकादायक ठरत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव :

शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. वाढती रुग्ण संख्या धोकादायक ठरत असल्याने शहरात दि. ५ मे अखेर सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला जात आहे. दरम्यान गुरुवारी पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्रेक द चेन साठी शहरातील दवाखाने, औषध दुकाने व दूध संकलन वगळता सर्व दुकाने बंद शंभर टक्के बंद ठेवली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट होता.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय कडेगाव नगरपंचायत, व्यापारी, भाजी विक्रेते व लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि कडेगाव शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाला होता. या निर्णयाचे अनुषंगाने शहरात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

तालुक्यात आणि विशेष करून शहरात रुग्ण संख्येचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील रुग्ण संख्या आता ३५० पर्यंत पोहचली आहे. वाढती रुग्ण संख्या घातक ठरत असल्यामुळे बंद पाळण्यात येत आहे. या बंदमुळे शहरातील वाढती रुग्ण संख्या कमी होईल असा अंदाज आहे. दरम्यान, गुरुवारी पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी संघटनांसह भाजीपाला व इतर विक्रेते यांनी या बंदला पाठिंबा दिल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. सर्वांनी शासनाचे नियम पाळावे व कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.