शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात शिवछत्रपतींना मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात ...

इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भगव्या ध्वजाची फडफडणारी आरास लक्षवेधी ठरली होती.

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील, शिवसेनेचे नगरसेवक शकील सय्यद, डॉ. संग्राम पाटील, वैभव पवार, चेतन शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, सुभाष शिंगण यांच्यासह नगरसेविका सुप्रिया पाटील, सुनीता सपकाळ, मंगल शिंगण, संगीता कांबळे, उपमुख्य अधिकारी प्रमिला माने-पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दिवसभरात शहर आणि परिसरातील युवकांचे जथ्थे भगवे झेंडे आणि शिवज्योत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी हा परिसर दिवसभर गुंजत राहिला होता. शाहिरी पोवाड्यांनी वातावरण चैतन्यदायी बनले होते. शहराच्या विविध परिसरात बालचमुंनीही उत्साहात शिवजयंती साजरी केली.

फोटो- १९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर शिवजयंती न्यूज

इस्लामपूर येथे पालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.