शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लोकनियुक्त महिला सरपंचांविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव, कांदे येथे रांगेने मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:30 PM

कांदे( ता.शिराळा) येथील महिला सरपंच यांच्या पतीचे ग्रामपंचायत कामकाजात अनाधिकृत पणे हस्तक्षेप , सदस्यांना विश्वासात घेऊन काम न करणे आदी कारणावरून उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंच यांचेवर ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाला संमती देण्या बाबत आज मोठया उत्साहात ग्रामसभा व मतदानास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देकांदे येथील लोकनियुक्त महिला सरपंचांविरुद्ध अविश्वास ठरावग्रामसभा, रांगेने मतदानास सुरुवात

विकास शहाशिराळा  :  कांदे( ता.शिराळा) येथील महिला सरपंच यांच्या पतीचे ग्रामपंचायत कामकाजात अनाधिकृतपणे हस्तक्षेप, सदस्यांना विश्वासात घेऊन काम न करणे आदी कारणावरून उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाला संमती देण्याबाबत आज मोठया उत्साहात ग्रामसभा व मतदानास सुरुवात झाली आहे.यामध्ये गुप्तमतदानाद्वारे ठराव मंजूर-नामंजूर मतदान होणार असून सायंकाळी ५ नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही ग्रामसभा गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल , तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर १२ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. गावामध्ये ४ प्रभाग आहेत, त्यामुळे ८ मतदानकेंद्रावर मतदान सुरू आहे.गुरुवार दि १२ डिसेंबर रोजी लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंच शशिकांत पाटील तसेच सदस्य विश्वास पाटिल, संग्रामसिंह पाटील, गजानन पाटील, विश्वनाथ पाटील, अर्चना पाटील, माधुरी पाटील, मनीषा कुंभार, अर्चना कुंभार, विमल कुंभार, व शशिकला कांबळे यांनी अविश्वास ठराव मांडला.

सरपंच मनमानी कारभार करत आहेत, कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत, सरपंच कर्त्यव्यात कसूर करतात व सरपंच यांचे पती अनधिकृतपणे ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, गावाच्या विकासात निरुत्साह दाखवतात तसेच धनादेश जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतात, त्यामुळे अविश्वास ठराव मांडू इच्छितो असे तहसीलदार गणेश शिंदे यांना कळविले होते. ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा पार पडली. यामध्ये हा ठराव ११ विरुद्ध १ मंजूर करण्यात आला होता.या ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी भाजप व काँग्रेस युतीचे ८ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत व सरपंच पाटील याही भाजप मधून निवडून आल्या आहेत. सरपंच अविश्वास ठरावसाठी सर्व जण एकत्र आले आहेत.

  • प्रभाग १-९००
  • प्रभाग २- ८१२
  • प्रभाग ३-९२२
  • प्रभाग ४- ११३४

असे एकूण ३ हजार ७६८ मतदार आहेत. यामध्ये १९८८ पुरुष १७८० स्त्री मतदार आहेत. ८ मतदान केंद्र व ४० अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचSangliसांगली