सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:54 IST2026-01-22T18:51:28+5:302026-01-22T18:54:48+5:30

बंडखोरी टाळण्यास नेत्यांकडून प्रयत्न

Record 1900 applications filed for Zilla Parishad, Panchayat Samiti | सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी १९०० इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६५७ व पंचायत समितीसाठी एक हजारांवर अर्जांचा समावेश आहे. दाखल अर्जांची गुरुवार दि. २२ रोजी छाननी होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले.

पाच दिवसांच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला.

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून सावध पवित्रा घेत अधिकृत उमेदवारांना पक्षाचे ‘ए. बी.’ फॉर्म देण्यात आले. वाळवा आणि मिरज तालुक्यांची माहिती रात्री उशीरापर्यंत मिळाली नाही. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गटासाठी ५०० आणि पंचायत समिती गणासाठी ८१९ अर्ज दाखल झाले.

बंडखोरी टाळण्यास नेत्यांकडून प्रयत्न

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

तालुकानिहाय दाखल अर्ज संख्या

तालुका / जिल्हा परिषद गट/ पंचायत समिती गण
कडेगांव / ३९ / ९५
शिराळा / ३४ / ७८
खानापूर / ३२ / ४४
आटपाडी / ६७ / १२५
तासगाव / ७२ / १७७
कवठेमहांकाळ / ८० / १२५
जत / ११३ / १७५
पलुस / ६३ / ९७
वाळवा ७८/१६३

Web Title : सांगली जिला परिषद चुनाव के लिए रिकॉर्ड 1900 आवेदन दाखिल

Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव में रिकॉर्ड 1900 आवेदन आए। गुरुवार से जांच शुरू। राजनीतिक दल आंतरिक विद्रोह रोकने का प्रयास कर रहे हैं। नेता बातचीत पर ध्यान केंद्रित करते हैं।

Web Title : Record 1900 Applications Filed for Sangli Zilla Parishad Elections

Web Summary : Sangli Zilla Parishad elections see a record 1900 applications. Scrutiny begins Thursday. Political parties attempt to prevent internal rebellion. Leaders focus on negotiations.