शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेसह २२ संस्थांची मान्यता रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

पतसंस्था, बँका आणि सहकारी प्रक्रिया उद्योगांची अनुत्पादकता वाढली असून, बुडीत कर्जांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे बँका, सहकारी पतसंस्था अवसायनात ...

पतसंस्था, बँका आणि सहकारी प्रक्रिया उद्योगांची अनुत्पादकता वाढली असून, बुडीत कर्जांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे बँका, सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्या असून, अनेक बँका व सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. बँका, सहकारी पतसंस्थांच्या थकीत कर्जदारांना सध्या १४ ते १५ टक्के व्याजदर लावला जात आहे. थकीत कर्जदारांकडून कर्जवसुलीसाठी शासनाची सध्या तर कोणतीच विशेष योजना नाही. यामुळे चार बँकांसह थकीत पतसंस्थांच्या कर्जदारांकडील कर्ज वसुलीत अडचणीत येत आहेत. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी बँकांसह २२ सहकारी संस्थांची मान्यता रद्दचा सहकार आयुक्तांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट

पाच लाखांपर्यंतच पैसे मिळणार

बँकांसह सहकारी संस्थांचे परवाने रद्द झाल्यामुळे अवसायनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कर्ज वसुलीबरोबरच ठेवीदारांचे पैसे परत देण्यास सुरुवात होणार आहे. बँक, सहकारी संस्थांमधील ठेवीदारांची पाच लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. त्यामुळे बँकेतून पाच लाखांपर्यंतच पैसे मिळणार आहेत. वसंतदादा शेतकरी बँकेसह चार बँका आणि पतसंस्थांच्या खातेदारांचेही पैसे परत मिळणार आहेत.

चौकट -

मान्यता रद्द होणाऱ्या सहकारी बँका, संस्था

- वसंतदादा शेतकरी बँक (सांगली)

-दि मिरज अर्बन बँक (मिरज)

- कुपवाड अर्बन बँक (कुपवाड)

- यशवंत सहकारी बँक (मिरज)

- कपिल कृषी प्रक्रिया उद्योग (शिवणी, ता. कडेगाव)

- युगांतर मागास पतसंस्था (कडेगाव)

- श्रीराम पतसंस्था (नेवरी, ता. कडेगाव)

- वसंतदादा शाबू प्रकल्प (रामानंदनगर, ता. पलूस)

- धनलक्ष्मी पतसंस्था (खरसिंग, ता. कवठेमहांकाळ)

-सोमेश्वर पतसंस्था (बिळाशी, ता. शिराळा)

-गुरुकृपा पतसंस्था (सांगली)

- मुस्लिम जनता पतसंस्था (सांगली)

- भाग्यलक्ष्मी पतसंस्था (सांगली)

- वसंतदादा शेतकरी बँक सेवकांची पतसंस्था (सांगली)

- दि मिरज अर्बन बँक सेवकांची पतसंस्था (मिरज)

- अजिंक्य पतसंस्था (सांगली)

- संगुदादा बोंद्रे पतसंस्था (हरिपूर)

-चिंतामणीनगर पतसंस्था (सांगली)

-मिरज शहर खोकी मालक पतसंस्था (सांगली)

-श्री कृष्णेश्वर पतसंस्था (मिरज)

- वसंतदादा पतंसस्था (कवलापूर, ता. मिरज)

- हनुमान पतसंस्था (सांगली)