शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा मतदारसंघात जो बंडखोर, तोच सिकंदर!

By admin | Updated: September 11, 2014 23:08 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीला चिंता : धोक्याची घंटा वाजू लागल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा; जयंत पाटील गटाची भूमिका गुलदस्त्यात

सांगली : शिराळा मतदारसंघात जो नेता बंडखोरी करतो, त्यालाच यश मिळते, असे इतिहास सांगतो. आजवरची राजकीय समीकरणेही तसाच बदल झालेला दाखवतात. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक किंवा काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळाली आणि दुसऱ्याने बंडखोरी केली, तर तो बंडखोर किंवा आघाडीला रामराम ठोकून निवडणुकीच्या रणांगणात उतरणारा तिसराच उमेदवार बाजी मारेल काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा पसरू लागल्याने काँग्रेस आघाडीपुढे धोक्याची घंटा वाजू लागली आहे.शिराळा मतदारसंघात नेहमीच बंडखोरी करणाऱ्याच्या कपाळावर विजयाचा गुलाल लागला आहे. सध्या विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांनी निवडणूक लढवणारच, असा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे तिकीट मिळणारच, असे आ. नाईक सांगतात, तर शिराळा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याचे सांगत सत्यजित देशमुख यांनीही ‘यावेळी थांबायचे नाही’ म्हणत नाईकांना आव्हान दिले आहे. दुसरीकडे शिवाजीराव नाईक यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. मतदारसंघाच्या इतिहासानुसार त्या निवडणुकीत त्यांना यशही मिळाले. त्यामुळे यंदा पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारा बाजी मारणार की, बंड करणारा निवडून येणार, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करू लागले आहेत. शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४९ गावे येतात. या गावांवर प्रभाव असणाऱ्या नेतेमंडळींत नानासाहेब महाडिक, अभिजित पाटील या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी मागीलवेळी आ. नाईक यांना मदत केली होती. यंदा मात्र या दोघांसह आणखी काही गावांतील नेते शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असल्याचे सांगतात. त्यातच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील गटाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. परिणामी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. आता बंडखोराच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. परिणामी आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)महायुतीचा उमेदवार निश्चितमहायुतीने शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी निश्चित केल्यामुळे त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. बंडखोराच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. परिणामी आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४९ गावे येत असून येथील नेत्यांची भूमिका निर्णायक